बॉलिवूडस्टार हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात १.८७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ती अडचणीत आली आहे.
एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मने याबाबत तक्रार केली असून सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर गोवातील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाºया नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता. करारात नमूद केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, असंही गुप्तांनी सांगितलं. सुझान खानकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर पणजी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:16 IST