शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

​हाय हिल्सने वाढतो तरुणींचा आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 21:07 IST

सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते.

सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. हे फूटवेअर केवळ सुंदर असून चालत नाहीत, तर ते घालून चालताना एक वेगळा आत्मविश्वास जाणवला पाहिजे. असाच आत्मविश्वास देण्याचे काम हाय हिल्स सॅण्डल करीत असतात.

डिटॅचेबल शूज.. 
वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला वापरत असाल तर तो खर्च बजेटच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. यासाठी तो खर्च वाचविण्यासाठी डिटॅचेबल शूज हा उत्तम पर्याय आहे. डिटॅचेबल शूज म्हणजे तुम्ही या सँडल्सचा वरचा किंवा विशिष्ट भाग हव्या असलेल्या रंगात बदलू शकता. समजा तुमच्याकडे हाय हिल्स आहेत त्याची डिटॅचेबल शूजमध्ये सोबत अटॅचमेंट करून त्याला हवा तो लूक देता येतो. काहींमध्ये सँडल्सचे रंगीबेरंगी बेल्टही उपलब्ध असतात. तुम्ही कपड्याच्या रंगात ते बेल्ट्स बदलू शकता. काहींसोबत वेगवेगळ्या आकारातले आणि रंगातले पॅटर्न असतात. मात्र हे जरा जास्तच खर्चिक आहे हे नक्की. 

किटन हिल्स 
    उंची जास्त असणाºया स्त्रियांना हिल्स घालण्याचा मोह असेल तर किटन हिल्स हा उत्तम पर्याय आहे. यात कमी उंचीच्या हिल्स उपलब्ध असतात. त्यामुळे उंच महिलांना फॅशनेबल लूक हवा असल्यास या हिल्सचा वापर करता येतो. 

पंप्स
     दोन ते तीन इंचाच्या या हिल्सच्या समोरचा भाग हा अत्यंत कमी असतो. त्यामुळे पायाचा खूप कमी भाग झाकला जातो. नखांचा काही भाग यामुळे झाकोळला जातो.

स्टेली टोस 
    या प्रकारच्या हिल्स ह्या सगळ्यात उंच प्रकारच्या गणल्या जातात. याच्या तळाला सुमारे एक ते दीड इंचाचा पृष्ठभाग असतो. त्यामुळे उंच असूनही त्यावर तोल सावरणे शक्य होते. 

वेजेस
    या प्रकारात बोटांपासून टाचांपर्यंतचा भाग हा एकसंध जोडलेला असतो. बोटांकडील भाग हा खाली असून टाचेकडील भाग हा उंच असतो. वेजेस प्रकारामध्ये सँडल आणि हिल्स अशा दोन्ही प्रकारामध्ये हे उपलब्ध आहेत. 

कोन हिल्स
    या हिल्सचा पुढील भाग निमुळता असून पाठीमागील हिल्स आयस्क्रीमच्या कोनाप्रमाणे असतो. त्यामुळे याप्रकाराला ‘कोन हिल्स’ म्हटले जाते. 

कन्व्हर्टेबल हिल्स 
    सॅण्डल्ससाठी जास्त खर्च करण्याची तयारी असल्यास कन्व्हर्टेबल हिल्स वापरु शकता. कारण ह्या प्रकारच्या सॅण्डल्स जरा जास्तच महाग असतात. यात उंच टाचा अगदी सहज कमी-जास्त करू शकता. अशा प्रकारच्या सँडल्सना तुम्ही कॅट हिल किंवा पॉइंटेड हिल्स करू शकता. जुन्या हिल्स बाजूला काढून ठेवून तुम्हाला हव्या त्या सोयीची सॅण्डल्सचे हिल्स कमी-जास्त करू शकता. शिवाय त्याचा तुम्ही फ्लॅट सँडल्स म्हणून वापरु शकता.  

जेल कुशन
हाय हिल्स वापरणाºयांसाठी आनंद देणारी वस्तू म्हणजे ‘जेल कुशन’ होय. याला ‘शू पॅडिंग’ असेही म्हणतात. हाय हिल्स घातल्याने शरीराचा भार कधीकधी टाचांवर आणि पुढच्या भागावर अधिक आल्याने पायांच्या तळव्यांची जळजळ होणे, ते दुखणे, सूज पकडणे हे त्रास सुरू होतात. या हिल्सच्या तळव्याचा भागही कडक असतो त्यातून त्रास अधिक होतो. या सगळ्या त्रासापासून जेल कुशन मुक्त करतात. पायाचे विशिष्ट प्रेशर पॉइंट असतात. त्या प्रेशर पॉइंटच्या ठिकाणी हे जेल कुशन बसवायचे असतात. टाच, तळवा, पायांची बोटे अशा तीन महत्त्वाच्या प्रेशर पॉइंटवरच्या ठिकाणी लावायला वेगवेगळ्या आकारात या कुशन येतात. या कशा वापरायच्या याचे मार्गदर्शन त्यात केलेले असते. या कुशन पायांचे संरक्षण करतात. या वापरल्यामुळे कोणत्याही एका पॉइंटवर जास्त दाब येत नाही. त्याचप्रमाणे या नरम आणि मऊ  असल्याने तळव्यांची जळजळ, सूजही येत नाही. एक कुशन तुम्ही अनेक वेळा वापरू शकता.

 हाय हिल्स वापरताना हे लक्षात ठेवा.. 
हाय हिल्स चपला फक्त रोज थोड्या वेळासाठीच वापराव्यात. कारण सतत हाय हिल्स वापरल्या तर मेंदूला रक्त पुरवठा करणाºया वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ  शकतो. उंच टाचेच्या चपला घेताना त्या चपला चांगल्या दर्जाच्या असतील, याची काळजी घ्या. नेहमीच्या वापरात साधारण एक इंच उंच टाचा असणाºया चपला वापरणे शरीरासाठी योग्य असते.