शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

​गुलिगन : लाखो अँड्रॉईड यूजर्सला गंडवणारा व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:44 IST

वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘गुलिगन’ या सॉफ्टेवेअरने लाखो गुगल यूजर्सच्या अकांउटचा ताबा मिळवून प्रचंड प्रमाणात डेटा चोरी केली.

मध्यंतरी लाखो अँड्रॉईड यूजर्सना एका व्हायरसचा जबर फटका बसला. वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘गुलिगन’ या सॉफ्टेवेअरने लाखो गुगल यूजर्सच्या अकांउटचा ताबा मिळवून प्रचंड प्रमाणात डेटा चोरी केली.‘चेक पॉर्इंट सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज्’च्या रिपोर्टनुसार, अँड्राईड ४.० आणि ५.० व्हर्जन वापरणाऱ्या मोबाबईल युजर्सना ‘गुलिगन’ने टार्गेट केले होते. गुगलची आॅपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या एकुण मोबाईलधारकांपैकी ७४ टक्के यूजर्सचा यामध्ये समावेश होता.या व्हायरस अ‍ॅटॅकमध्ये लोकांचे ईमेल अ‍ॅड्रेस, मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आॅथेंटिकेशन डेटा तसेच जीमेल, गुगल फोटोज्, गुगल डॉक्स आणि इतर सर्व्हिसेसमधील संवेदनशील माहिती चोरण्यात आली.‘अत्यंत आधुनिक सायबलर हल्ला असे या अ‍ॅटॅकचे वर्णन करता येईल. जगभरातील लाखो लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्यात हॅकर्सना यश आले. विशेष म्हणजे हॅकर्स आता जूने व्हर्जन वापरणाऱ्या मोबाईल यूजर्सना टार्गेट करीत आहेत, असे चेक पॉर्इंटचा मोबाईल उत्पादनाचा प्रमुख मायकल शौलोव्हने सांगितले.अँड्रॉईड मॅलवेअरसर्वप्रथम गेल्या वर्षी ‘गुलिगन’ व्हायरसचा कोड ‘चेक पॉर्इंट’ने शोधला होता. त्याचेच नवे रुप यावर्षी आॅगस्ट महिन्यात दिसून आले. दर दिवशी सुमारे १३ हजार स्मार्टफोन्समध्ये हा व्हायरस पसरायचा.प्रामुख्याने आशिया खंडातील मोबाईल यूजर्सना याचा सर्वाधिक फटका बसला. युरोपमधील नऊ टक्के अँड्रॉईड यूजर्सचादेखील यामध्ये समावेश आहे.‘गुलिगन’युक्त अ‍ॅप्स किंवा फिशिंग लिंक्सवर क्लिक केले असता हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो. त्यानंतर मग हॅकर्स तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा मिळवतात. त्यानुसार मग ते लपून अ‍ॅप डाऊनलोड करून किंवा त्यांना चुकीची रेटिंग देऊन पैसे कमवतात.यूजर्सची वैयक्तिक माहितीसुद्धा विक ली जाते. चेक पॉर्इंटने याची माहिती गुगलला दिलेली असून कंपनीने लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले आहे.