शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंग इन्व्हाईट लिंकवर क्लिक करणे धोक्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:49 IST

१५ नोव्हेंबरपासून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू झाली असून, यूजर्स खूप आनंदात आहेत. हे नवे फिचर आपल्या प्रत्येक मित्राच्या मोबाईलमध्ये येण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये एक लिंक व्हायरल होताना दिसत आहे.

१५ नोव्हेंबरपासून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू झाली असून, यूजर्स खूप आनंदात आहेत. हे नवे फिचर आपल्या प्रत्येक मित्राच्या मोबाईलमध्ये येण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये एक लिंक व्हायरल होताना दिसत आहे. 'या लिंकवर क्लिक केल्यावरच तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ कॉलिंग सुरू करता येईल', असा दावा या लिंकमध्ये केला आहे. मात्र या इन्व्हाईट लिंकवर क्लिक करणे धोक्याचे असल्याचे तज्ञांच्या निदर्शनास आले आहे. हे नवे फिचर सुरू झाल्यापासून हॅकर्सनी हॅकींगसाठी एक नवी शक्कल लढवली असून, व्हिडिओ कॉलिंग संदर्भातील लिंक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केली असल्याचे समजते. आपण जर या लिंकवर क्लिक केले तर एक वेबपेज ओपन होते. त्यावर तुम्हाला हे फिचर चालू करण्यासाठी पुन्हा एकदा क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. ही लिंक सुरूवातीला विश्वासार्ह वाटत असल्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप यूजर्स त्यावर क्लिक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लिंकपासून सावध रहा. व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंगचे फिचर तुमच्या मोबाईलमध्ये सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंगसाठी तुमच्या गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल प्ले स्टोअरवर जाऊन तुमचे अ‍ॅप अपडेट करा. त्यानंतर आपोआप तुमचे व्हिडिओ कॉलिंग सुरू होईल.