​बाळाच्या ‘विचित्र’ नावाला कोर्टाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:13 IST2016-04-21T14:43:33+5:302016-04-21T20:13:33+5:30

 एका न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना आता दोनदा विचार करतील.

The ban on child's 'weird' court | ​बाळाच्या ‘विचित्र’ नावाला कोर्टाची मनाई

​बाळाच्या ‘विचित्र’ नावाला कोर्टाची मनाई

क्सपियर म्हणाला होता की, नावात काय आहे? परंतु ज्यांना शाळेत नावामुळे चिडवले जाते त्यांना जाऊन विचारा की नावात काय असते. इंग्लंडमधील एका न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना आता दोनदा विचार करतील.

वेल्स भागातील एका आईने तिच्या जुळ्या मुलींची नावे ‘सायनाईड’ आणि ‘प्रीचर’ अशी ठेवली. कोर्टाने मात्र तिला असे करण्यास मनाई केली. आईच्या मते, साईनाईड हे नाव मुलीसाठी खूप चांगले आहे. कारण साईनाईडन या विषामुळेच हिटलरचा मृत्यू झाला होता. आणि तसेही माझ्यामुलीचे नाव काय ठेवायचे याचा संपूर्ण अधिकार मला एक आई म्हणून आहे.

पण तिचा हा युक्तीवाद जस्टिस एलेनॉर किंग यांना मान्य नाही. त्यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, अशा विचित्र नावामुळे मुलींवर भावनिकदृष्ट्या वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आईने मुलीचे नाव बदलावे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टासमोर ही बाब आणून दिली होती. बलात्कारातून या दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला असून आईच्या व्यसनाधिनतेमुळे मुलींना फोस्टर केअर होममध्ये ठेवण्यात आले होते.

Web Title: The ban on child's 'weird' court