लघुग्रह धडकण्या आधीच डायनासोर लुप्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:14 IST2016-04-20T13:44:19+5:302016-04-20T19:14:19+5:30

लघुग्रह आदळण्याच्या कोट्यवधी वर्षांपूर्वीच डायनासोरची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर होती

Asteroid fumes already dinosaurs disappeared? | लघुग्रह धडकण्या आधीच डायनासोर लुप्त?

लघुग्रह धडकण्या आधीच डायनासोर लुप्त?

ळेमध्ये आपण शिकलो आहोत की, या भूतलावरील एकेकाळचा सर्वात विशाल प्राणी डायनासोर  पृथ्वीवर  लघुग्रह आदळण्यामुळे लुप्त झाले. परंतु नवे संशोधन आता हा समज खोडून काढताना दिसतेय. संशोधकाच्या एका गटाने दावा केला आहे की, लघुग्रह आदळण्याच्या कोट्यवधी वर्षांपूर्वीच डायनासोरची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर होती.

शेवटच्या वर्षांत डायनासोरची आरोग्यस्थिती कशी होती याविषयी सुरू असलेल्या संशोधन मोहिमेत यामुळे नवीन प्रकरण जोडले जाणा आहे. एक गट मानतो की, डायनासोरची वृद्धी होत होती तर दुसºया गटाच्या मते, त्यांच्या अस्तित्वाला पहिलेच उतरती कळा लागली होती.

‘नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्स’च्या संशोधकांनी जगभरातील जीवाश्मांचा अभ्यास करून त्यांचे सांखिकी विश्लेषण केले. त्यातून असे दिसून आले की, लघुग्रह आदळला त्याच्या चार कोटी वर्षांआधी डायनासोरच्या काही प्रजाती झपाट्याने विलुप्त होत होत्या. त्यातुलनेत नव्या प्रजाती फार हळू वृद्धी पावत होत्या.

इंग्लंडमधील रिडिंग विद्यापीठातील तज्ज्ञ मनाबू सकामोटो म्हणाले की, अशा प्रकारचे निष्कर्ष आम्हाला अपेक्षित नव्हते. लघुग्रह जरी डायनासोर लुप्त होण्याचे प्रमुख कारण असले तरी, त्यापूर्वीच त्यांना उतरती कळा लागली होती.

Web Title: Asteroid fumes already dinosaurs disappeared?