शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 13:33 IST

देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्देदेशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्वाधिक ८२.९३ इतके गुण मिळाले असून हे मंडळ प्रथम स्थानावर आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांतून ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.

मुंबई - देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जानेवारी २०१९ मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या गुणवत्ता तपासणीचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करण्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले होते.  

राष्ट्रीय हरित लवादाच्या या आदेशान्वये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाची गुणवत्ता तपासणी एका विशेष समितीमार्फत मे २०१९ मध्ये केली होती. यामध्ये देशभरातील सर्व प्रदूषण नियंत्रण मंडळे/प्रदूषण नियंत्रण समित्या यांच्या कामकाजाची तपासणी विविध विषयांच्या अनुषंगाने करण्यात आली होती.

यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्वाधिक ८२.९३ इतके गुण मिळाले असून हे मंडळ प्रथम स्थानावर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता पडताळणीत पर्यावरणविषयक गुणवत्ता मापन, कायद्याची अंमलबजावणी आणि दैनंदिन व प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती (डेटा) व्यवस्थापन व लोकसंपर्क, निर्णय क्षमता व संशोधन, प्रगती व प्रशिक्षण या बाबींचा समावेश करण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी मंडळाने पर्यावरणविषयक कायद्याच्या अंमलबजावणीची दाखवलेलीतत्परता व धोरणात्मक निर्णय यामुळे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता पारदर्शी कामकाजाच्या माध्यमातून वेळेत संमतीपत्राचा निपटारा, प्लॅस्टिकबंदी, हवा गुणवत्तातपासणी, जलप्रदूषण नियंत्रणाकरिता उचललेली पावले तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांतून ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.

संगणकीय प्रणालीत केला बदल

मंडळाने डिजिटायझेशन, संगणकीय प्रणालीच्या ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये बदल, ईझ ऑफ डुइंग बिझनेस या माध्यमातून औद्योगिक आस्थापनांना करावयाच्या अर्जांची संख्या कमी करण्यावर भर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाशी संबंधित सर्व आस्थापनांशी सातत्याने ठेवलेला संवाद आणि मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांची सकारात्मक मानसिकता यामुळे प्रथम स्थानाची गुणवत्ता प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणMaharashtraमहाराष्ट्रpollutionप्रदूषण