शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 05:36 IST

सीईटी सेलने यंदा बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात येत्या आठवडाभरात करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे.

सीईटी सेलने यंदा बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी, तसेच एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्यांचे नियोजन सीईटी सेलने सुरू केले असून त्याचे संभावित वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे सीईटी परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पार पडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. त्यानुसार आता डिसेंबरच्या अखेरीस अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

सीईटी सेलमार्फत यंदा २४ मार्चपासून सामायिक प्रवेश परीक्षांना सुरुवात केली जाणार आहे. सध्या एकूण १७ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यातील बहुतांश प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारच्या सत्रात ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील होतील.

असे आहे वेळापत्रकसीईटी सेलने यंदा एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमासाठी पहिली प्रवेश परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे मध्ये घेणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मेदरम्यान घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिलमध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११  मे रोजी घेतली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CET Exam Registrations to Begin Within a Week: Details Here

Web Summary : Maharashtra CET Cell prepares to begin registration for 2026-27 entrance exams within a week. Tests for engineering, pharmacy (PCM), agriculture (PCB), and MBA/MMS courses will be held twice. The schedule is announced, aiming for timely exams and admissions.
टॅग्स :examपरीक्षा