Maharashtra HSC 12th Results 2026 Out: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असा पहा रिझल्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:47 IST2026-05-02T11:22:53+5:302026-05-02T12:47:55+5:30
Maharashtra Board Class 12 HSC Results 2026 Declared: प्रतीक्षा संपली; विद्यार्थी, पालकांचे लक्ष निकालाकडे. बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. ३.९० लाख अर्जांनंतर आता निकालाची प्रतीक्षा संपली असून, गुण कसे पाहायचे, अधिकृत वेबसाईटची यादी आणि मार्कशीट डाऊनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स येथे वाचा.

Maharashtra HSC 12th Results 2026 Out: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असा पहा रिझल्ट
Maharashtra Board HSC Results 2026 on mahresult.nic.in:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल आज, शनिवारी (दि. २ मे, २०२६) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी पोर्टलवर उपलब्ध होतील. निकाल कुठे पाहायचा आणि कसा पाहायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:
निकालासाठी अधिकृत संकेतस्थळे (Official Links)
विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात:
mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
hscresult.mkcl.org
results.navneet.com
How to Check: ऑनलाईन निकाल पाहण्याच्या स्टेप्स
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा:
१) वेबसाईटला भेट द्या: वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा.
२) HSC Result 2026 निवडा: होमपेजवर 'HSC Examination Result March 2026' या लिंकवर क्लिक करा.
३) तपशील भरा: तुमचा 'Seat Number' (आसन क्रमांक) आणि 'Mother's First Name' (आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे) प्रविष्ट करा.
४) निकाल पहा: सर्व माहिती भरल्यानंतर 'View Result' या बटणावर क्लिक करा.
५) डाऊनलोड करा: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट (Print Out) किंवा डिजिटल प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि पुढील प्रक्रिया
Digilocker: विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिका Digilocker App मध्ये देखील संग्रहित करून ठेवू शकतात.
गुणपडताळणी (Verification): निकालात काही शंका असल्यास ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल.
पुनर्मूल्यांकन: उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे अनिवार्य आहे.
श्रेणीसुधार: उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी 'Class Improvement Scheme' अंतर्गत आगामी तीन परीक्षांच्या संधी उपलब्ध असतील.