विशेष लेख: जगातलं एकमेव ‘सेव्हन स्टार’ हॉटेल ‘बंद’ होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:50 IST2026-04-21T10:49:32+5:302026-04-21T10:50:17+5:30

कुठल्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं तर तिथे किती पैसे मोजावे लागतात, हे आपल्याला माहीत आहे. अर्थात तिथल्या सोयीसुविधाही तशाच दर्जेदार असतात आणि आपला नावलौकिक जपण्याचा प्रयत्नही या हॉटेल्सकडून सातत्यानं केला जातो.

World’s Only ‘Seven-Star’ Hotel Burj Al Arab to Close for 18 Months for Grand Renovation | विशेष लेख: जगातलं एकमेव ‘सेव्हन स्टार’ हॉटेल ‘बंद’ होणार!

विशेष लेख: जगातलं एकमेव ‘सेव्हन स्टार’ हॉटेल ‘बंद’ होणार!

कुठल्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं तर तिथे किती पैसे मोजावे लागतात, हे आपल्याला माहीत आहे. अर्थात तिथल्या सोयीसुविधाही तशाच दर्जेदार असतात आणि आपला नावलौकिक जपण्याचा प्रयत्नही या हॉटेल्सकडून सातत्यानं केला जातो. त्यामुळेच जगभरातील गर्भश्रीमंतांकडून अशा हॉटेल्सना कायम पसंती दिली जाते. जगातील एकमेव ‘सेव्हन स्टार’ हॉटेल दुबईमध्ये आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जवळपास २५ वर्षांपासून संपूर्ण जगातील गर्भश्रीमंत आणि व्हीआयपी पाहुण्यांची पहिली पसंती ठरलेलं हे सेव्हन स्टार हॉटेल आता ‘बंद’ होत आहे! 

- का? त्यालाही काही करणं आहेत. इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धादरम्यान इराणचं ड्रोन या हॉटेलवर आदळलं होतं. त्यामुळे या हॉटेलचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे हे हॉटेल संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आलं. मात्र, हॉटेल बंद होण्याचं हे कारण नाही. त्यामागे दुसरंच कारण आहे, पण तत्पूर्वी फाइव्ह स्टार हॉटेल आणि सेव्हन स्टार हॉटेल म्हणजे काय, त्यात काय फरक असतो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

मुळात कोणत्याही हॉटेलसाठी अधिकृतरीत्या सर्वोच्च दर्जा ‘फाइव्ह स्टार’ एवढाच आहे. त्यांच्या उत्कृष्ट दर्जामुळे त्यांना ‘फाइव्ह स्टार’चा दर्जा दिला जातो. मात्र ‘सेव्हन स्टार’ हॉटेल.. असा काही प्रकार नसतोच. अधिकृतरीत्या जगात एकही ‘सेव्हन स्टार’ हॉटेल नाही; पण तरीही ज्या हॉटेल्सच्या प्रॉपर्टीज अल्ट्रा लक्झरी आहेत आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्येही ज्यांचा दर्जा सर्वोत्तम मानला जातो, त्यातील काही हॉटेल्सना ‘सेव्हन स्टार’ हॉटेल म्हटलं जातं. त्यात हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही हॉटेल्सची गणना केली जाते. मात्र या सर्व हॉटेल्समध्ये खऱ्या अर्थानं ‘सेव्हन स्टार’ हाॅटेलचा सन्मान संपूर्ण जगभरात केवळ एकाच हॉटेलला दिला जातो आणि ते म्हणजे दुबईतील ‘बुर्ज अल अरब’ हे आत्यंतिक आलिशान हॉटेल! 

दुबईतीलच ‘मँडरिन ओरिएंटल’, त्याचप्रमाणे जगभरातील ‘सिग्नेल सेऊल’, ‘पंगू सेव्हन स्टार’, टाऊन हाऊस गॅलेरिया.. इत्यादी हॉटेलन्सनाही ‘सेव्हन स्टार’ मानलं जातं; पण ‘बुर्ज अल अरब’ची तोड कोणालाच नाही. ..हे हॉटेल आता ‘बंद’ होणार असलं तरी कायमस्वरुपी नाही. पुढचे दीड वर्ष म्हणजेच १८ महिन्यांसाठी हे हॉटेल त्याचा दर्जा कायम टिकवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी, रिनोव्हेशनसाठी बंद ठेवलं जाणार आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर ट्रिस्टन ऑयर यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

१९९० च्या दशकात दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतुम यांनी अशा ऐतिहासिक इमारतीची कल्पना केली होती. पॅरिसमध्ये जसं आयफेल टॉवर किंवा ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी ओपेरा हाऊस आहे, तशीच इमारत आपल्याकडे असावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी ब्रिटिश वास्तुकार टॉम राइट यांनी नॅपकिनवर पारंपरिक अरबी नौका (धो)चं चित्र काढलं, जे पुढे या हॉटेलच्या आकाराचं स्वरूप बनलं. या रचनेचा उद्देश दुबईच्या समुद्री वारशाचं प्रतिबिंब दाखवणं होता. 

बुर्ज अल अरब हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून २८० मीटर उंचीवर पुनर्निर्मित बेटावर वसवलेलं आहे. हॉटेलच्या आतली रचना भव्य राजवाड्यासारखी आहे, ज्यात संगमरवर आणि २४ कॅरेट सोन्याच्या परतीनं सजवलेले २०२ डुप्लेक्स सूट आहेत. हॉटेलमध्ये पाहुण्यांना सोन्याची परत चढवलेले आयपॅड दिले जातात!

Web Title : दुबई का एकमात्र सेवन-स्टार होटल, बुर्ज अल अरब, अस्थायी रूप से बंद होगा

Web Summary : दुबई का प्रतिष्ठित बुर्ज अल अरब, जिसे अक्सर एकमात्र 'सेवन-स्टार' होटल कहा जाता है, नवीनीकरण के लिए 18 महीने के लिए बंद हो जाएगा। ड्रोन की घटना के बावजूद, यह बंद फ्रांसीसी डिजाइनर ट्रिस्टन Auer द्वारा उन्नयन के लिए है। एक जहाज के पाल से प्रेरित, यह दुबई की समुद्री विरासत को दर्शाता है।

Web Title : Dubai's Only Seven-Star Hotel, Burj Al Arab, to Temporarily Close

Web Summary : Dubai's iconic Burj Al Arab, often called the only 'seven-star' hotel, will close for 18 months for renovations. Despite a drone incident, the closure is for upgrades by French designer Tristan Auer. Inspired by a ship's sail, it reflects Dubai's maritime heritage.