शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे ‘ऑडिट’ करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 05:20 IST

अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले आहे. अशावेळी माध्यमांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला हवे व आपली प्रतिमा जपायला हवी.

- ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर 

प्रसारमाध्यमे ही नागरिकांचे डोळे व कान, अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. प्रामाणिक, तटस्थ, सरळमार्गी प्रसारमाध्यमे लोकशाहीतील संस्थांचे संरक्षण करू शकतात तर अप्रामाणिक, भ्रष्ट आणि विकलेली प्रसारमाध्यमे लोकशाहीसाठी शाप आहेत. अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले असून, आधीसारखी त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही. माध्यमांवर एकच बाजू लावून धरण्याचे, खरे वार्तांकन न करण्याचे आरोप होत असून, त्यांना लोकांनी ‘गोदी मीडिया’ यासारखी नावे दिली आहेत. पराकोटीची बाब म्हणजे ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘प्राइम टाइम’ दर्शकांची खोटी आकडेवारी दाखविणाऱ्या एका ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊस’विरोधात पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. या माध्यमातून संबंधित ‘मीडिया हाऊस’ने केवळ खासगी आस्थापनाच नव्हे तर सरकारच्याही जाहिराती जास्त दराने मिळविल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 



गुजरातमधील एका वर्तमानपत्राविरोधात ‘ईडी’ने केलेली कारवाईदेखील जनतेसाठी धक्कादायकच आहे. संबंधित वर्तमानपत्राने गुजरातीचा खप २३ हजार ५०० अंक तर इंग्रजीचा ६ हजार ३०० असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात त्यांचा खप अनुक्रमे ३०० ते ६०० व ० ते २९० इतकाच होता. 
अगोदरच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर संशयाचे ढग दाटलेले असताना, सर्वसामान्य जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसताना अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे प्रामाणिक वृत्तपत्रांच्या प्रतिमांना तडा जाण्याची भीती आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांचे नियंत्रण १८६७ च्या प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्टद्वारे होते. या कायद्यानुसार वर्तमानपत्रांनी स्वत:हून पुरविलेल्या आकडेवारीच्या आधारावर ‘प्रेस रजिस्ट्रार’कडून वर्तमानपत्रांच्या खपाची नोंदणी होते. वर्तमानपत्रांनी पुरविलेल्या माहितीची खातरजमा करण्याची कुठलीही यंत्रणा नाही.



जगाच्या विविध भागात ‘एबीसी’ (ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन) कार्यरत आहेत. भारतात प्रकाशक, जाहिरातदार, जाहिरात एजन्सी सदस्य असलेली एक ‘नॉन प्रॉफिट’ संघटना म्हणून १९४८ मध्ये ‘एबीसी’ची स्थापना झाली. संस्थेचे सदस्य असलेल्या प्रकाशन संस्थांच्या खपाचे आकडे प्रमाणित करणारी ‘ऑडिट’ यंत्रणा ‘एबीसी’ने विकसित केली असून, दर सहा महिन्यांनी खपाचे आकडे ‘एबीसी’कडून घोषित होतात आणि ‘पॅनल’वरील सनदी लेखापालांच्या माध्यमातून त्यांचे ‘ऑडिट’ होते. एकूण मुद्रित माध्यमांच्या खपाच्या आकड्यांबाबत ही संस्था ‘वॉचडॉग’चे काम करते आणि त्यामुळे जाहिरातदारांना विविध प्रकाशनांच्या खपाची खातरजमा करता येते. प्रशासकीय व वाणिज्यविषयक उपक्रमांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सरकारकडून जाहिरातींचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक तिजोरीतून त्यासाठी मोठा निधी खर्च होतो; मात्र कमी खपाच्या वर्तमानपत्रांनी आकडे फुगवून जाहिराती पळविल्या तर जाहिराती प्रकाशित करण्याचा उद्देशच फोल ठरतो. सरकारसोबतच सामान्य जनतेचीदेखील फसवणूक होते. जास्त खप दाखविण्यासाठी वर्तमानपत्रांकडून न्यूजप्रिंट खरेदी करून तोच पेपर नंतर काळ्या बाजारात विकण्याचे गैरप्रकार होत असल्याच्या अफवा नेहमीच ऐकायला मिळतात. 

इलेक्ट्रॉनिक तसेच मुद्रित प्रसारमाध्यमांविरोधात पोलीस व ‘ईडी’तर्फे गुन्हे दाखल झाल्याने जाहिराती मिळविण्यासाठी विविध वर्तमानपत्रांकडून ‘आरएनआय’ तसेच इतर यंत्रणांना पुरविण्यात येणाऱ्या खपाच्या आकड्यांची चौकशी अनिवार्य आहे. सरकारकडून जाहिरातींवर खर्च करण्यात येणारा पैसा हा करदात्यांचा आहे. त्यामुळे ‘मनी लाँडरिंग’ आणि ‘आयपीसी’च्या विविध कायद्यांतर्गत व दक्षता आयोग, ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि राज्य पोलीस यांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत ही बाब येते.

 एका बाजूला भारतीय प्रसारमाध्यमांची प्रतिमा वेगाने खालावत आहे, तर भ्रष्टाचारविरोधातील लढ्याच्या जागतिक मानांकनातदेखील भारत माघारला आहे. अशावेळी वर्तमानपत्रांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला व आपल्या क्षेत्राची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने मुद्रित माध्यमांना परत जनतेचा विश्वास संपादित करता येई.
 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळा