शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

सायरन वाजतात; पण आम्ही निश्चिंत आहोत, काळजी करू नका..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:18 IST

यूएईत सर्वाधिक म्हणजे सुमारे ४३ लाख लोक भारतीय आहेत. युद्धाच्या तणावामुळे भारतीयांचे लक्ष इकडे लागले आहे; पण इथे सारे सुरळीत आहे.

शिल्पा मोहिते
दुबईस्थित अभियंता 
तंत्रज्ञान, संस्कृती यावर लेखन

युनायटेड अरब अमिरात किंवा यूएईमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ४३ लाख लोक भारतीय आहेत. त्यामुळे इथे तणावाची परिस्थिती निर्माण होताच साहजिकच भारतीयांच्या नजरा आमच्या दिशेनं रोखल्या गेल्या. मात्र, युद्धजन्य परिस्थिती असूनही यूएईमध्ये दैनंदिन जीवन अगदी सुरळीत सुरू आहे, हे मला आवर्जून नोंदवावंसं वाटतं.

दुबई हा मुळातच शांत, स्थिर आणि सुरक्षित प्रदेश म्हणून ओळखला जातो. इथल्या वास्तव्याबद्दल काय आवडतं असं मला कुणी विचारलं तरी ‘इथली सुरक्षितता’ असं मी नेहमी म्हणत आले आहे. स्थैर्य आणि सुरक्षितता हे ज्या देशाचं वैशिष्ट्य आहे तिथेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भीती, अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं सावट सर्वांच्याच मनावर होतं; पण यूएई सरकारने मात्र नागरिक, रहिवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य मानलं. नुसतं तसं सांगून ते थांबले नाहीत, तर तशी पावलंही उचलण्यात आली. त्याची प्रचिती आम्ही रोज अगदी जवळून घेत आहोत.

सध्या आमचं जगणं ‘अलर्ट्स’ वर अवलंबून आहे. ताणतणावाच्या परिस्थितीत जे काही घडत असेल त्याची खरीखरी माहिती नागरिकांना देण्यावर इथल्या प्रशासनाचा भर आहे. त्यामुळेच अधिकृत माध्यमं आणि मोबाइल अलर्ट्सच्या मदतीनं आम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाते. तणाव निवळल्यानंतर त्याबाबतही नागरिकांना सांगितलं जातं. सुरुवातीला प्रत्येक अलर्ट हृदयाचा ठोका चुकवत होता; पण आता त्याची जागा विश्वासानं घेतली आहे. नुकताच रात्री १२ वाजता वाजलेला एक अलर्टही आम्ही ‘रिसिव्ह’ केला, त्यातल्या सूचनांचं पालन केलं आणि तणाव निवळल्याचा ‘अलर्ट’ आल्यानंतर निश्चिंतपणे झोपलो. सरकारच्या कार्यक्षमतेचं आणि त्यावर नागरिकांच्या असलेल्या विश्वासाचंच हे प्रतीक आहे.

इथले सगळे मॉल्स, सुपरमार्केट्स, कार्यालयं आणि सार्वजनिक सेवा सुरळीत सुरू आहेत. लोक नेहमीसारखेच वावरताना, कामावर जाताना, खरेदी करताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतात. 

इथल्या सुपरमार्केटमध्ये मी दैनंदिन गरजेच्या वस्तू आणायला गेले होते. काही नागरिक ट्रॉलीज भरभरून सामान खरेदी करत होते, मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही, घाबरून वस्तू ‘स्टॉक’ करून ठेवू नका असं सांगून प्रशासनानं नागरिकांना दिलासा दिला. नागरिकांनीही सहकार्य केलं. एरवी इथल्या ‘होमडिलिव्हरी सर्व्हिसेस’ आम्हाला पाच ते सात मिनिटांत, उशिरात उशिरा आठ मिनिटांत मिळतात, सध्या त्यासाठी अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. ॲमेझॉनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे; पण त्याबद्दल तक्रार नाही. 

शेख महंमद बिन झायेद अल नाह्यान हे यूएईचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यूएईमध्ये वास्तव्य करणारे सर्व रहिवासी इथले नागरिक नसले तरी आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहेत, त्यांचं आमच्यावर आणि आमचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्या सुरक्षिततेची आम्हाला काळजी आहे असं म्हणत त्यांनी इथे राहणाऱ्या प्रत्येकाला दिलासा दिला आहे. त्यामुळे इथली परिस्थिती तणावसदृश असली तरी आम्ही निश्चिंत आहोत, तुम्हीही काळजी करू नका.. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sirens sound, but we are calm; don't worry.

Web Summary : Despite regional tensions, life in UAE remains normal. The government prioritizes resident safety, providing timely alerts and reassurance. Essential services continue, with residents trusting the authorities' commitment to their well-being. Everyone is calm; don't worry.
टॅग्स :Dubaiदुबई