शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:38 IST

Rupee Fall Reason: हे सगळं चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं, याचा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात घोळायला लागला. पण यातल्या एकेक गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत.

- अच्युत गोडबोले (आर्थिक विषयाचे तज्ज्ञ)अलीकडेच एकीकडे भारताचा जीडीपी वाढीचा दर ८.२% असल्याची बातमी आली आणि त्याचवेळी डॉलरचा भाव ९० रुपयांपेक्षा जास्त झाल्याचीही बातमी आली. त्याचबरोबर स्टॉक मार्केट खूप वरती जातंय अशीही बातमी आली.  मग हे काय गौडबंगाल आहे ? हे सगळं चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं याचा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात घोळायला लागला. पण यातल्या एकेक गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. फॉरेन एक्सचेंजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेव्हा पुरवठ्यापेक्षा चलनाची मागणी जास्त होते तेव्हा चलनाचा भाव वाढतो आणि मागणीच्या मानानं चलनाचा  पुरवठा वाढतो तेव्हा चलनाचा भाव कमी होतो. 

कुठलाही देश जेव्हा निर्यातीपेक्षा आयात जास्त करतो तेव्हा त्याच्या चलनाचा भाव घसरतो. याचं कारण निर्यात आणि आयात या दोन्ही गोष्टी डॉलरमध्ये होत असल्यामुळे आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा डॉलर्स आपल्याला मिळतात पण जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपण रुपयाचे डॉलर्स विकत घेतो आणि ते डॉलर्स देऊन  परदेशातून वस्तू किंवा सेवा आयात करतो. त्यामुळे डॉलरचा भाव वाढतो व रुपयाचा घसरतो. भारतामध्ये गेली अनेक वर्ष हेच चाललेलं असल्याने रुपयाचा भाव घसरत चालला आहे. 

आणखीन एक कारण म्हणजे शेअर मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा काढून घ्यायला सुरुवात करणं. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात शेअर विकत घेतो तेव्हा तो आपले डॉलर्स देऊन रुपये विकत घेतो. त्या रुपयांनी भारतातले शेअर्स विकत घेतात. याउलट जेव्हा ते शेअर्स विकतात तेव्हा मिळालेल्या रुपयांचे डॉलर्स खरेदी करतात आणि ते परदेशी नेतात. त्यामुळे डॉलर्सची मागणी वाढते व डॉलरचा भाव रुपयाच्या मानानं वाढतो म्हणजेच रुपया घसरतो.  परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे रुपयाचा भाव घसरतोय. 

काय करावे लागेल? 

रुपयाचा भाव वाढण्याकरता निर्यात वाढवली पाहिजे, किंवा परदेशी गुंतवणूक आकर्षुन घेतली पाहिजे. या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर तिसरा उपाय म्हणजे रिझर्व बँक डॉलर्स विकून रुपये विकत घेते व अशा कृत्रिम तऱ्हेनं रुपयाची मागणी वाढवून रुपयाचा भाव वधारते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee Fall Explained: Key Reasons Behind the Currency's Depreciation

Web Summary : Rupee dips due to high imports, foreign investor pullout. Boosting exports and attracting investment can stabilize it. RBI intervention offers temporary relief.
टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनInflationमहागाई