शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय दूर करण्याची सरकारवर जबाबदारी

By admin | Updated: November 29, 2014 23:55 IST

आघाडी सरकारने मागासलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकणवर सातत्याने अन्याय केला, अशी टीका भाजपाने अनेकदा विरोधी बाकावर बसून केली.

आघाडी सरकारने मागासलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकणवर सातत्याने अन्याय केला, अशी टीका भाजपाने अनेकदा विरोधी बाकावर बसून केली. वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांसाठी आघाडीचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार जबाबदार असल्याची ओरड केली. आता नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दोन्हीही मागासलेल्या विदर्भातून आलेले असताना अन्याय दूर करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे.
1999मध्ये युतीची सत्ता गेली तेव्हा राज्यावर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचंड गहजब केला होता. 15 वर्षानंतर आघाडीची सत्ता गेली आणि युतीऐवजी भाजपाच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. आघाडी सरकारने मागासलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि कोकणवर सातत्याने अन्याय केला, अशी टीका भाजपाने अनेकदा विरोधी बाकावर बसून केली. वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांसाठी आघाडीचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार जबाबदार असल्याची ओरड केली. आता नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दोन्हीही मागासलेल्या विदर्भातून आलेले असताना अन्याय दूर करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे. 
रखडलेले प्रकल्प असा विषय समोर येतो त्या वेळी प्रामुख्याने विचार होतो तो सिंचन प्रकल्पांचा. देशातील नंबर 1चे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सिंचनाची सरासरी आजही केवळ 17 टक्के आहे.  सिंचनात काय घोटाळे झाले हा वेगळा विषय आहे; पण आज अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे तर 7क् हजार कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी उभारताना फडणवीस सरकारची कसरत होणार आहे. 
 उद्योगांची उभारणी राज्याच्या सर्व विभागांत झाली नाही.  औद्योगिकीकरणाचे सगळे फायदे पुणो, मुंबई, ठाणो, नाशिक आणि काही प्रमाणात औरंगाबादला मिळाले. उर्वरित मराठवाडा, विदर्भ, कोकणाला आजही प्रतीक्षा आहे. विकेंद्रित औद्योगिक विकासाद्वारे त्याला नवे सरकार गती देईल का याबाबत उत्सुकता आहे. राज्य भारनियमनमुक्त करण्याची घोषणा गेल्या 15 वर्षात अनेकदा झाली; पण भारनियमन कायम राहिले. बाजूचे छोटेसे छत्तीसगड राज्य इतर राज्यांना वीज देण्याच्या क्षमतेचे बनले मात्र आपण आपलीच गरज भागवू शकत नाही. प्रकल्पांना विशिष्ट कालमर्यादेत मान्यता देणो, त्यांचे आर्थिक नियोजन, खर्चाबाबतची पारदर्शकता आणि शिस्त, प्रकल्पांची किंमत वारेमाप वाढण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणो अशा अर्निबध पद्धतीने काम होत राहिले. सरकारमध्ये बसलेल्यांना याचे भान नव्हते; आणि सत्ताधा:यांना या आर्थिक बेशिस्तीची आणि तिच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देण्याचे मनोधैर्य नोकरशाहीत नव्हते ही खरी शोकांतिका आहे. युती शासनात आणि आघाडी सरकारमध्येही असेच घडत राहिले. विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला 1983मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली तेव्हा त्याची किंमत 4क्क् कोटी रुपये होती, आज ती 13 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यापेक्षा नाकर्तेपणाचा आणखी पुरावा तो काय असणार? भूसंपादनापासून प्रकल्पाच्या उभारणीर्पयतचा प्रचंड विलंब आणि त्याच्या पोटात घोटाळे या दुष्टचक्रातून महाराष्ट्र कधी बाहेर पडेल?  
 
- यदु जोशी