शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृतदेहासह १३ तास उडत राहिलं विमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 04:51 IST

दुर्गंधी वाढत गेल्यानंतर जवळपास प्रत्येक प्रवाशाला नाकाला रुमाल लावावा लागला! 

रविवारची गोष्ट. ब्रिटिश एअरवेजची फ्लाइट. हाँगकाँग ते लंडन प्रवास. साठ वर्षांच्या एक वृद्ध महिलेला विमान प्रवासात अचानक त्रास होऊ लागला आणि टेकऑफनंतर सुमारे एक तासानं तिचा मृत्यू झाला. या घटनेची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. कारण, मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहासह तब्बल १३ तास विमान उडत राहिलं! मृत्यूनंतर मृतदेह विमानाच्या मागील भागात ठेवण्यात आला, जिथंला खालचा भाग गरम होता. त्यामुळे हळूहळू दुर्गंधी पसरू लागली आणि विमानात बसलेल्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा असह्य त्रास झाला. अनेकांना मळमळलं, काहींना उलट्या झाल्या, तर काहींना श्वास घ्यायला त्रास झाला. दुर्गंधी वाढत गेल्यानंतर जवळपास प्रत्येक प्रवाशाला नाकाला रुमाल लावावा लागला! 

क्रू मेंबर्सनी सुरुवातीला मृतदेह टॉयलेटमध्ये ठेवण्याचा विचार केला, पण नंतर हा मृतदेह कापडात गुंडाळून ‘गॅली’मध्ये ठेवण्यात आला. गॅली म्हणजे विमानाचा तो भाग, जिथे फ्लाइट स्टाफ (क्रू) जेवण, चहा-पाणी, नाश्ता तयार करतं आणि त्यासाठीचं सामान ठेवतं. याच ठिकाणाहून प्रवाशांना जेवण, पाणी, चहा-कॉफी दिलं जातं. साधारणपणे हा भाग विमानाच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूस असतो.

लंडनला पोहोचल्यानंतर पोलिसांनी विमानात येऊन तपास केला आणि पुन्हा सुमारे तासभर प्रवाशांना त्यांच्या सीटवरच बसवून ठेवलं. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पायलटनंही फ्लाइट मधेच थांबवण्याऐवजी किंवा परत वळवण्याऐवजी फ्लाइट लंडनपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावरूनही सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे. कारण प्रवाशांना इतक्या दुर्गंधीचा सामना करावा लागल्यानंतर निदान ‘इमर्जन्सी’ म्हणून तरी पायलटनं विमान नजीकच्या विमानतळावर उतरवायला हवं होतं.. 

यावरून पायलटवरही ताशेरे ओढले जात आहेत. कारण कोणतीही इमर्जन्सी आली की विमान उतरवायचं की आपल्या इच्छितस्थळापर्यंत न्यायचं याचा अधिकार पायलटकडे असतो. 
मात्र कोणत्या घटनेला ‘इमर्जन्सी’ मानायचं यासाठीचे नियमही ठरलेले आहेत. विमानात आग लागली किंवा धूर भरला जाणे ही सर्वात गंभीर परिस्थिती मानली जाते. अशावेळी विमान तत्काळ जवळच्या विमानतळावर उतरवलं जातं. याशिवाय इंजिन फेल होणं, केबिन प्रेशर संपणं, इंधन कमी असणं.. या गोष्टी इमर्जन्सी मानल्या जातात. 

हार्ट अटॅक किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास फ्लाइट डायव्हर्ट केली जाऊ शकते. खराब हवामान किंवा सुरक्षेला धोका (बॉम्बची धमकी) असल्यासही पायलट जवळच्या विमानतळावर फ्लाइट उतरवू शकतो. मात्र, सौम्य तब्येत बिघडणं किंवा एखाद्या प्रवाशाचा मृत्यू होणं ही ‘इमर्जन्सी’ मानली जात नाही. अशा प्रकरणांत अनेकदा फ्लाइट गंतव्यस्थानापर्यंत सुरू ठेवली जाते. 

‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA)नुसार, ‘इमर्जन्सी’च्या वेळेस पायलट ‘मेडे मेड’ किंवा ‘पेन पेन’ कॉल देऊन माहिती देतो आणि पुढचा निर्णय घेतो. या विमान प्रवासातही ‘महिलेचा मृत्यू’ ही घटना ‘इमर्जन्सी’ नसल्यानं पायलटनं विमान प्रवास पुढे सुरू ठेवला. हवाई प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई तेव्हाच दिली जाते जेव्हा एअरलाइनची चूक किंवा निष्काळजीपणा सिद्ध होतो. या प्रकरणात एअरलाइनचं म्हणणं आहे, आम्ही प्रत्येक गोष्ट  नियमाप्रमाणेच केली आहे..
 

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's body flew for 13 hours on Hong Kong-London flight!

Web Summary : A British Airways flight from Hong Kong to London continued for 13 hours with a deceased passenger. Crew initially considered moving the body, but it remained in the rear, causing a strong odor. Passengers suffered, and the pilot's decision to continue the flight sparked debate.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीairplaneविमान