शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आई.. माफ कर ! आम्ही तुला वाचवू नाही शकलो..

By सचिन जवळकोटे | Updated: April 21, 2021 08:31 IST

सोलापूर लोकमत

 -सचिन जवळकोटे

हॉस्पिटलमधून हाकलून दिलेल्या आजारी आईनं भररस्त्यावर हतबल मुलाच्या कुशीत जीव सोडला, तेव्हा संवेदनशील लेकरांच्या हृदयातून आर्त हुंकार निघाला.. ‘आई.. माफ कर !’

मध्यरात्रीच्या अंधारात बघ तुझे डोळेकसं मोठ्या आशेनं चमकले..एवढा मोठा माझा भारी ल्योकमला नक्की वाचवेल, असं तुला वाटले..पण नाही गं आई.. तुला वाचवू शकलोतुझे शेवटचे आचके गपगुमान बघत बसलो..गाडी, घोडा, बंगला सारं काही पायथ्याशीतरीही कसा आईविना भिकारी बनलो..

गावातल्या दवाखान्याचे दरवाजे बंद झालेम्हणून मोठ्या आशेनं आपण सोलापुरात आलो..पण उपचार करण्यापूर्वीच ‘गॉन केस’ म्हणतहाकलून देणाऱ्या डॉक्टरला पाहून हादरलो..भर मध्यरात्री भर रस्त्यावर रंगभवन चौकाततू माझ्यासमोर तडफडत राहिली..स्मार्ट सिटीच्या स्मार्ट स्ट्रीट लाइटखालीकेविलवाण्या डोळ्यांतून अवहेलना झिरपली.. बंद होत चाललेल्या तुझ्या पापण्यांतूनजगावरचा विश्वास कसा उडत चालला होता... कारण ‘वन डे’ व्हेंटिलेटरच्या बिलापेक्षासात दिवसांचा बकरा दवाखान्यात मोठा होता..पेशंटचं बॅकग्राउंड पाहून कॅल्क्युलेशन करणारं प्रोफेशनल मॅनेजमेंट मेडिकल लॉबीत घुसलेलं..प्रेतांच्या गर्दीला फुल सीझन म्हणणाऱ्यांनापाहून कसायाचं सत्तूरही क्षणभर लाजलेलं..

एक माजी आमदार म्हणे रात्रभरऑक्सिजनसाठी ठाण मांडून बसलेले..लोकांना वाटलं किती ही सामाजिक बांधीलकी,मात्र ते स्वतःच्याच हॉस्पिटलसाठी धडपडलेले..‘दसपट रिटर्न’ म्हणत मेडिकल लाइनमध्येहीअंगठेछाप मंडळी सेफ इन्व्हेस्टमेंट करताहेत..धंदेवाईक दलालांची टोळी बनवून इथंहीगलिच्छ राजकारणाचा अड्डा भरवताहेत.. मतांची भीक मागत गल्लीबोळांत फिरणाऱ्यानेत्यांनी दुसऱ्या लाटेची दखल न घेतलेली..‘पॉझिटिव्ह’वाल्यांना ‘निगेटिव्ह’ उत्तर देतपालकमंत्र्यांची गाडीही होम डिलिव्हरी झालेली..समन्वयाचा अभाव अन् नियोजनाची चूकशोधण्यासाठी आत्मचिंतनाची गरज भासलेली..कागदी आकड्यांमध्ये रंगलेल्या अधिकाऱ्यांचीआता झोप उडविण्याची वेळ आलेली...

दुष्काळ शब्दाची चटक लागलेल्या जिल्ह्यातऑक्सिजन, इंजेक्शनचीही टंचाई जाणवते..अन्याय सहन करण्याची सवयच झालेलीजनता आता लसीशिवायही जगू शकते..शेतकऱ्यांच्या जिवावर गबरगंड बनलेलेसाखरसम्राट अशावेळी कुठं गायब झाले..एखादं उपचार केंद्र उघडलं असतं तरबाया-बापड्यांनी आशीर्वादही असते दिले..

नगरसेविकेच्या लसीवरून राजकारणकरणाऱ्याचं तोंड जनतेसाठी का बंद असतं..फोटोपुरतं पब्लिकमध्ये येणाऱ्या आमदारांचंघरात बसून संपर्क अभियान जोरात चालतं..जावळ-बारश्याला हजेरी लावणारे लोकप्रतिनिधीअशा मोठ्या संकट काळात कुठं लपले..फुकटच्या इंजेक्शनचाही शो करूनपत्रकबहाद्दरांनी जबरदस्त क्रेडिट हाणले..

औषधांच्या काळ्या बाजारात तुंबड्या भरणाऱ्यांनीजिवंतपणी तर बिचाऱ्या रुग्णांकडून लाटलं..मेल्यानंतरही स्मशानभूमीतील सरणासाठीतथाकथित समाजसेवकांनी भरपूर लुटलं..म्हणूनच आई.. आम्हाला माफ कर..आम्ही तुला वाचवू नाही शकलो..मुर्दाडांच्या दुनियेत माणुसकी मरतानातडफडत कबूल करतो की होय.. आम्ही हरलो !

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल