शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना पुरुष खेळाडूंचे कौतुक, महिला खेळाडूंचा मात्र तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 08:41 IST

विंटर ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचे कौतुक करताना ट्रम्प यांची खोचक टिप्पणी संतापाचे कारण ठरली आहे.

-प्राजक्ता पाडगांवकर (भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक, अटलांटा)
मिलानो कॉर्टिना येथे विंटर ऑलिम्पिक नुकतेच पार पडले. त्यात अमेरिकन संघाला तब्बल ३३ पदके मिळाली, यात २१ पदके महिला खेळाडूंनी मिळवली. १२ सुवर्णपदकांपैकी ८ महिलांना मिळाली. अमेरिकेच्या या घवघवीत यशानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन आइस हॉकीच्या पुरुषांच्या विजेत्या संघाला काही तासांत फोन करून अभिनंदन केले. या संभाषणादरम्यान ते खोचकपणे म्हणाले, 'आता महिला संघालादेखील पाचारण करावे लागेल व्हाइट हाऊसच्या पार्टीसाठी, अन्यथा मला इम्पीच करतील.' - यावर लॉकररूममध्ये एकच हशा पिकला. तिथले विजेते पुरुष खेळाडूही या हलक्या विनोदावर हसले, कारण तो देशाच्या प्रमुख नेत्याने केलेला विनोद होता.

यंदाच्या ऑलिम्पिकच्या देदीप्यमान यशात स्त्रियांचा नुसता वाटा नसून, संपूर्ण यशाची पायाभरणी त्यांची. मानवीय क्षमतांची अतिउच्च स्तरावर होणारी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन महिला संघाने हॉकीचा सामना ७-० असा जिंकला. ज्या देशाचे नाव त्यांनी मोठे केले, त्या देशाच्या नेतृत्वाने मात्र त्यांच्या यशाची खिल्ली उडवली, उत्तरादाखल महिला संघाने व्हाइट हाऊसचे निमंत्रण नाकारले.

देशात सुरू असलेली स्थलांतरितांची गळचेपी, एपस्टीन फाइल्सचा गदारोळ, अशा पार्श्वभूमीवर अमेरिकन खेळाडू इटलीला पोहोचले, तिथे उपराष्ट्रपती व्हॅन्स यांना धिक्कारण्यात आलेले असताना, देशासाठी जीव तोडून खेळणे अजिबात सोपे नव्हते. तरीही, खेळाडूंनी, विशेषतः महिलांनी, अमेरिकेसाठी पदकांची रास लावली, देशाचा मान राखला, त्यांना घरचा आहेर मिळाला तो हा असा!

खेळाडूंनी खेळासाठी खेळावे, इतर राजकीय गोष्टीत पडू नये, असे अनाहूत सल्लेदेखील पुष्कळ मिळाले, तरी अनेक खेळाडूंनी स्वतःची मते निर्भीडपणे मांडली. ख्रिस लिलीस याने खंत व्यक्त केली, देशात सुरू असलेल्या प्रकाराबाबत. हंटर हेस याने देशाचे ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व करतेवेळी मनात संभ्रम असल्याचे बोलून दाखवले. 

फिगर स्केटर आम्बर ग्लेन हिने LGBTQ घटकांवर अमेरिकेत सुरू झालेल्या अत्याचारांवर भाष्य केले. मिकेला शिफरीन हिने नेल्सन मंडेला यांचे शांतता, समभाव याबद्दलचे विचार मांडले. फिगर स्केटर आलीस लिऊ हिचे सहज वावरणे, जिंकल्यावर मनमुराद आनंद व्यक्त करणे, तिचे वडील चायनीज वंशाचे असणे, या सगळ्याच बाबत सध्याचे सरकार नाराज झाले आहे. 

ऑलिम्पिक माणसातील उच्चतम गुणांची स्पर्धा असते. जिथे देशप्रेम आले, देशाभिमानासाठी पराकोटीचे झटणे आले, तिथे त्या देशातील सद्यःस्थितीबाबत मते खेळाडूंना निश्चित असणार. जिंकल्यावर ज्या देशाचा झेंडा फडवणार, त्याबाबत अभिमान तर वाटायला हवा ! अशाअर्थी ऑलिम्पिक सदासर्वकाळ राजकीय होते, आहे आणि राहणार. 

अमेरिका म्हणजे उदात्त, स्वतंत्र, भेदांपलीकडे, माणसांतील सर्वश्रेष्ठत्व साजरा करणारा मुक्त देश, अशी अनेक वर्षे असलेली महती. अभिमानाने अमेरिकन झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरवणे सवयीचे असलेल्या खेळाडूंना गेली काही वर्षे खरोखर कसोटीची ठरत आहेत. 

निवृत्त खेळाडू मेगन रपिनो, २०२० च्या एका मुलाखती दरम्यान म्हणाली, 'देशाभिमान म्हणजे तरी काय, तर सतत स्वतःला देशासाठी उत्तम सिद्ध करत राहणे.' खेळाडू हेच तर करत असतात, म्हणूनच सर्व खेळाडूंना भेदांपलीकडे कौतुक, मान सन्मान मिळायला हवा; पण हे सध्याचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांच्या गावीही नाही !
praj.padgaonkar@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Praises Male Athletes, Disdains Women: A Critical View

Web Summary : Trump favored male Olympians, slighting women's achievements despite their medal haul. Athletes, particularly women, faced political pressures, yet excelled. Criticism followed Trump's dismissive remarks, highlighting a divide between athletes' values and the administration's stance. Some athletes openly criticized the political climate.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष