धुळ्यातील पांझरेत तरुण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:48 AM2019-09-13T11:48:22+5:302019-09-13T11:50:29+5:30

गणपतीचे विसर्जन : रात्रभर सुरु होते शोधकार्य

The young man drowns in a mist | धुळ्यातील पांझरेत तरुण बुडाला

धुळ्यातील पांझरेत तरुण बुडाला

Next

धुळे : शहरातील पांझरा नदीत १८ वर्षाचा तरुण वाहून गेल्याने त्याचा शोध सुरु होता़ शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला़ गणपती विसर्जनाच्यावेळेस ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ मृत झालेल्या तरुणाचे भागवत पवार (पूर्ण नाव माहिती नाही) असे नाव आहे़ 
गुरुवारी अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाच्या मुर्तीचे विसर्जनाची सर्वत्र लगबग सुरु होती़ लहान-मोठ्या गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन जो तो आपआपल्या पध्दतीने करत होता़ अशातच एकविरा देवी मंदिराजवळ गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण पांझरा नदीत उतरले़ त्यातील काही परत आले़ त्यातील एक जण पाण्यात बुडाला़ त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ पण, पाण्याचा प्रवाह आणि खोलगट भागामुळे तो हाती सापडला नाही़ याशिवाय अंधार असल्यामुळे नेमके काय सुरु आहे, हे कोणालाही कळत नव्हते़ घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली़ तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली़ अंधारामुळे अडचणी येत असल्याने पुन्हा सकाळी मदतकार्य सुरु झाले आणि भागवत पवार (१८, रा़ गोराणे-विटाई ता़ शिंदखेडा) याचा मृतदेह आढळला़ तो धुळ्यात अकरावीचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले़ मात्र, त्याचे पूर्ण नाव समजू शकलेले नाही़ 

Web Title: The young man drowns in a mist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे