१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज १०० वर काॅल्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:28+5:302021-04-20T04:37:28+5:30

धुळे : काेरोनाच्या काळात रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग असल्यासारखी परिस्थिती आहे, परंतु ही वेटिंग केवळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात असल्याचे सांगण्यात ...

Waiting for 108 ambulances; 100 calls per day! | १०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज १०० वर काॅल्स!

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज १०० वर काॅल्स!

धुळे : काेरोनाच्या काळात रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग असल्यासारखी परिस्थिती आहे, परंतु ही वेटिंग केवळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांची आणि मृतांची संख्या सर्वाधिक असल्याने ही परिस्थिती आहे.

जिल्ह्यात १८ रुग्णवाहिका रस्त्यांवर २० किलोमीटरच्या अंतराने आहेत. या रुग्णवाहिकांनी गेल्या तीन महिन्यांत २ हजार ८३६ रुग्णांना सेवा दिली आहे. त्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून, अपघात आणि इतर गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले.

काॅल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजर

१०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. रुग्णवाहिकेच्या नियंत्रण कक्षाला दररोज शंभरपेक्षा अधिक काॅल येतात. काॅल आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत रुग्णवाहिका हजर होते. महामार्गांवर तर त्याहीपेक्षा कमी कालावधीत अपघातग्रस्तांना सेवा मिळते.

१०८ रुग्णवाहिकेने कोरोनासाठी देखील विशेष सेवा सुरू केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांची एक गाडी सेवा देण्यासाठी तत्पर असते, परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे वेटिंगही वाढत आहे. सर्वाधिक वेटिंग हिरे रुग्णालयात आहे.

१०८ रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णवाहिकांचे खिसा खाली करणारे दर पाहता १०८ रुग्णवाहिका मात्र खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरली आहे. प्रवासादरम्यान रुग्णवाहिकांमध्ये प्रसूतीच्या घटना थक्क करणाऱ्या आहेत.

ग्रामीणमधून १०८ रुग्णवाहिकेला मागणी

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ग्रामीण भागात गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी वाहनधारक सहसा तयार होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेला सर्वाधिक मागणी आहे.

Web Title: Waiting for 108 ambulances; 100 calls per day!