बेशिस्त पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:27+5:302021-04-16T04:36:27+5:30

दंडाची कारवाई कापडणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ग्रामपंचायतीने कठोर निर्बंध लागू केले आहेत. गर्दी करू नये, मास्कचा वापर ...

Unruly parking | बेशिस्त पार्किंग

बेशिस्त पार्किंग

दंडाची कारवाई

कापडणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ग्रामपंचायतीने कठोर निर्बंध लागू केले आहेत. गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

दिव्यांग मुलांना साहित्य

दोंडाईचा : शिंदखेडा पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अभियान गटसाधन केंद्रांतर्गत दिव्यांग विद्यार्थींना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. व्हीलचेअर, एमएस आयडी किट, सीपी चेअर, ट्रायसिकल, असे साहित्य दिले.

बाजारावर नियंत्रण हवे

धुळे : भाजीपाला, किराणा दुकाने, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आदी ठिकाणी गर्दी होत आहे. या गर्दीला पाहून लाॅकडाऊन झाले आहे, असे वाटत नाही. अशीच गर्दी होत असेल, तर लाॅकडाऊनचा काय फायदा असा प्रश्न आहे.

महिनाभराचा बाजार

धुळे : लाॅकडाऊन १५ दिवसांचे असले तरी लांबू शकते, म्हणून ग्रामीण भागातील महिला शहरात येऊन महिनाभराचा बाजार करून घेत आहेत. पाचकंदील चाैकातून बाजार घेऊन जाणाऱ्या महिलांनी लक्ष वेधून घेतले होते.

Web Title: Unruly parking