डांगशिरवाडेजवळ दुचाकीस्वाराची बिबट्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 08:27 PM2020-09-13T20:27:01+5:302020-09-13T20:27:13+5:30

साक्री तालुका। धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार गावाकडे पळाल्याने बचावला

A two-wheeler hit a leopard near Dangshirwade | डांगशिरवाडेजवळ दुचाकीस्वाराची बिबट्याला धडक

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : डांगशिरवाडे येथील जगदिश अहिरे हा दुचाकीस्वार शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने येत असतांना गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ अचानक बिबटया समोर आल्याने तो दुचाकीसह त्याच्यावर धडकला. मोटारसायकलीसह तो रस्त्याच्या बाजुला पडला. तेथून उठवून तो गावाकडे पळत सुटल्याने तो बचावला.
डांगशिरवाडे गावातील जगदिश अहिरे या तरुणाचा लॉकडाऊनमुळे रिक्शा चालविण्याचा व्यवसाय बंद झाल्याने सध्या तो दुचाकीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बोपखेल-विजयपूर परिसरातून भाजीपाला विक्री करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास तो गावाकडे परतत असताना गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ त्याच्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आला. त्यामुळे त्याची दुचाकी बिबटयाला धडकली. त्यानंतर दुचाकी रस्त्यावरुन घसरली. भेदरलेल्या अवस्थेत जगदिशने दुचाकी तिथेच सोडून गावाकडे पळ काढला. गावाच्या पुलावर गावातील जगन सोनवणे, उमेश सोनवणे व कृषिकांत सोनवणे यांनी त्याला धीर दिला. नंतर जगन सोनवणे व कृषिकांत सोनवणे यांनी आपल्या कारने रावसाहेब सोनवणे, मुकेश सोनवणे व रविंद्र सोनवणे यांना सोबत घेऊन घटना स्थळावरुन जगदीशची दुचाकीला व जगदिशला घरी पोहोचवले.गावाकडे जोरात पळत आल्याने जगदीशचा श्वास कोंडला गेल्याने काही काळ त्याची तब्येत नाजूक झाली होती पण नंतर त्याच्यावर उपचा केल्याने तो पूर्वपदावर आला. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत व तो बाजूच्या मक्याच्या शेतात पळाला असल्याची शक्यता आहे.
ही घटना घडण्याच्या काही वेळेपूर्वी तेथून एका जीपमधून बोपखेलकडे जाणाऱ्या तरुणांनी त्याठिकाणी रस्त्याच्याकडेला बिबट्या उभा असल्याचे पाहिले होते. त्यांनी जगदीशला बिबट्याच्या दिशेने जातांना पाहून आपली गाडी परत फिरवली होती पण ते पोहोचल्या आधीच जगदीशच्या दुचाकीने बिबट्याला धडक दिली आणि तो गावाकडे पळाल्याची घटना घडल्याचे जीपमधील तरुणांनी सांगितले.

Web Title: A two-wheeler hit a leopard near Dangshirwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.