शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह फोटो काढून तरुणीवर अत्याचार, संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 22:07 IST

गुंगीचे औषध देवून केला प्रताप, तरुणीच्या हिंमतीमुळे गुन्हा दाखल

धुळे - उपचाराच्या बहाण्याने तरुणीला गुंगीचे औषध देवून तिचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले. त्या आधारे तिला ब्लॅकमिल करीत तिच्यावर अत्याचार केला. तिचे शोषण केल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यात घडली. त्याच्यापासून सुटका करीत तिने निजामपूर पोलीस ठाण्यात एका विरुध्द शुक्रवारी फिर्याद दाखल झाली़ फिर्याद दाखल होताच संशयिताला अटक करण्यात आली.साक्री तालुक्यातील टेंभे येथील २० वर्षीय तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. २६ मार्च ते १३ डिसेंबर या कालावधीत अत्याचाराचा प्रकार घडला. साक्री तालुक्यातील महिर येथील दिनेश लहानू सरक याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या तरुणीची तब्येत बरी नसताना तिला सलाईन लावून त्या सलाईनमध्ये काहीतरी गुंगीचे औषध टाकण्यात आले. तिला बेशुध्द करण्यात आले. मोबाईलमध्ये तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून नंतर तिला फोन करुन सांगण्यात आले. ते फोटो डिलीट करतो, पण भेटायला ये असे सांगून त्याने त्या तरुणीला साक्री येथील बसस्थानकार बोलाविले. तेथून त्याने त्या तरुणीला मोटारसायकलीवर बसूवन एका हॉस्पिटलमध्ये घेवून गेला. तेथील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेले. त्या ठिकाणी गेल्यावर फोटो डिलीट करण्यास सांगितल्यावर दिनेश याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच सोबत जबरदस्तीने नग्न अवस्थेत फोटोही काढून घेतला. कोणाला काही सांगितले तर हे फोटो वॉटस्अ‍ॅपवरील डीपी म्हणून ठेवेन असे म्हणत धमकाविले. यानंतर वेळोवेळी फोन करुन होणाऱ्या नवऱ्याला हे फोटो पाठविन, तुझा साखरपुडा होवू देणार नाही असे धमकी देत त्रास दिला.सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने हिम्मत करुन निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित दिनेश लहानू सरक (रा. महिर ता. साक्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुुरु आहे़

आक्षेपार्ह फोटो काढून तरुणीवर अत्याचार, संशयिताला अटकगुंगीचे औषध देवून केला प्रताप, तरुणीच्या हिंमतीमुळे गुन्हा दाखलधुळे - उपचाराच्या बहाण्याने तरुणीला गुंगीचे औषध देवून तिचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले. त्या आधारे तिला ब्लॅकमिल करीत तिच्यावर अत्याचार केला. तिचे शोषण केल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यात घडली. त्याच्यापासून सुटका करीत तिने निजामपूर पोलीस ठाण्यात एका विरुध्द शुक्रवारी फिर्याद दाखल झाली़ फिर्याद दाखल होताच संशयिताला अटक करण्यात आली.साक्री तालुक्यातील टेंभे येथील २० वर्षीय तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. २६ मार्च ते १३ डिसेंबर या कालावधीत अत्याचाराचा प्रकार घडला. साक्री तालुक्यातील महिर येथील दिनेश लहानू सरक याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या तरुणीची तब्येत बरी नसताना तिला सलाईन लावून त्या सलाईनमध्ये काहीतरी गुंगीचे औषध टाकण्यात आले. तिला बेशुध्द करण्यात आले. मोबाईलमध्ये तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून नंतर तिला फोन करुन सांगण्यात आले. ते फोटो डिलीट करतो, पण भेटायला ये असे सांगून त्याने त्या तरुणीला साक्री येथील बसस्थानकार बोलाविले. तेथून त्याने त्या तरुणीला मोटारसायकलीवर बसूवन एका हॉस्पिटलमध्ये घेवून गेला. तेथील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेले. त्या ठिकाणी गेल्यावर फोटो डिलीट करण्यास सांगितल्यावर दिनेश याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच सोबत जबरदस्तीने नग्न अवस्थेत फोटोही काढून घेतला. कोणाला काही सांगितले तर हे फोटो वॉटस्अ‍ॅपवरील डीपी म्हणून ठेवेन असे म्हणत धमकाविले. यानंतर वेळोवेळी फोन करुन होणाऱ्या नवऱ्याला हे फोटो पाठविन, तुझा साखरपुडा होवू देणार नाही असे धमकी देत त्रास दिला.सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने हिम्मत करुन निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार, संशयित दिनेश लहानू सरक (रा. महिर ता. साक्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे