हजारो भाविकांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:13 PM2020-02-16T22:13:48+5:302020-02-16T22:14:09+5:30

गजानन महाराज प्रगट दिन । गजानन महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला; चंद्रकांत केले, गोपाळ केले

Thousands of devotees have visited Gajanan Maharaj | हजारो भाविकांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन

dhule

Next

दाम्पत्याच्या हस्ते महाआरती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त देवपूरातील प्रति शेगाव गजानन महाराज मंदिरात दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक कार्यक्रम झाला़ यावेळी गजानन महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता़
श्री सद्गुरू गजानन महाराज (शेगाव) यांच्या प्रगट दिनानिमित्त गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे शनिवारी माघ वैद्य सप्तमी गजानन महाराजांचा प्रगट दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला़ पहाटे महाअभिषेक झाला़ त्यानंतर दुपारी १२ वाजता चंद्रकांत केले, लता केले यांच्या हस्ते महाआरती झाली़ यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले, सुनंदा केले, दिलीप कोठावदे, वंदना कोठावदे, केदारनाथ बधान, नगरसेविका ज्योत्सना पाटील, प्रफुल्ल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष कमलाकर जोशी, रोहीणी जोशी उपस्थित होते़ ंसंस्थेतर्फे महिला भाविकांना बाजरीचे पिठ देण्यात आले होते़ भाविकांनी घरुन तयार करुन आणलेल्या भाकरी देण्यासाठी देखील मोठी रांग लागली होती़ त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़
प्रगट दिनाच्या कार्यक्रमात शहर तसेच ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले़ दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला़ भाविकांच्या गर्दीमुळे मंदिरासह कॉलनी परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते़ यात्रेप्रमाणेच मंदिराच्या परिसरात लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती़ हजारो भाविकांनी केलेल्या गजानन महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता़
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आठवडाभर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सोमवारी पालखी सोहळा झाला़ तीन दिवस किर्तनाचा कार्यक्रम झाला़ गेल्या सप्ताहभर सुरू असलेल्या या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरासह आजुबाजुच्या सर्व कॉलन्यांच्या परिसरात अतीशय भक्तीमय वातावरण होते़ शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी देखील या कार्यक्रमांचा लाभ घेतला़
देवपूराती प्रति शेगाव गजाजन महाराज यांचे मंदिर आता खान्देशात नावाजु लागले आहे़ दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत असून यात्रा भरू लागली आहे़

Web Title: Thousands of devotees have visited Gajanan Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे