शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भाडेकरुने केला घरमालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:33 IST

महिलेसोबत केली झटापट : आरडाओरड झाल्याने संशयिताला पकडले

धुळे : स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव यांच्या डोक्यात मेमाने नामक भाडेकरु तरुणाने लोखंडी पावडी टाकून खून केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली़ यावेळी मारेकरी तरुणाने महिलेशी झटापट केली़ पण प्रसंगावधान राखून तिने स्वत: सुटका करीत आरडा ओरड केल्यामुळे नागरीकांच्या कचाट्यात मारेकरी सापडला़ त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़शहरातील चितोड रोडवरील संभाप्पा कॉलनीच्या पाठीमागे राजहंस कॉलनी आहे़ या कॉलनीत रमेश हिलाल श्रीराव (६०) यांचे निवासस्थान आहे़ ते स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी धुळे शहरासह कुसुंबा, एमआयडीसी, पुष्पांजली मार्केट अशा विविध शाखेमध्ये काम केले आहे़ एप्रिलमध्ये ते निवृत्त झाले़ ते सध्या राजहंस कॉलनीत स्थायिक झाले असून त्यांनी आपले घर मेमाने नामक व्यक्तीला भाडेतत्वावर दिले आहे़ ते देखील निवृत्त शिक्षक आहे़ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते भाड्याने राहत आहेत़ त्यांचे भाडे थकले असल्यामुळे श्रीराव यांनी तगादा लावल्याची चर्चा आहे़ मेमाने यांच्या मुलाने त्याचा राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांचे घर गाठले़ त्यावेळेस श्रीराव हे आपल्या वरच्या खोलीत ध्यानधारणा करत बसले होते़ त्याचवेळेस त्यांच्या डोक्यात लोखंडी पावडी टाकून त्यांचा खून करण्यात आला़ यानंतर वरच्या खोलीतून खाली आल्यानंतर मारेकरी तरुणाने त्यांच्या पत्नीला देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यात झटापट झाल्याने त्या त्याच्या तावडीतून सुटल्या आणि घराच्या गॅलरीत जावून त्यांनी आरडा ओरड केली़ महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरीकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि मारेकरी तरुणाला पकडले़ शहर पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले़ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला असून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़ संशयित तरुणाच्या अटकेची कारवाई केली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे