शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयातील ३१ खेळाडूंना मिळाली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:28 IST

२०१७-१८ या वर्षात २ लाख १४ हजार रूपये वितरीत

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागविलेखेळाडुंसाठी शिष्यवृत्ती योजना२ लाख १४ हजार २०० रूपये वितरीत

आॅनलाइन लोकमतधुळे : शासनाच्या क्रीडा व युवक संचालयातर्फे शालेय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील ३१ खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना २ लाख १४ हजार २०० रूपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. खेळाला प्रोत्साहन मिळावे उद्देशाने या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी व्हावी आणि राज्यासह देशात जागतिक पातळीवरील राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने शासनाच्या क्रीडा व युवक मंत्रालयातर्फे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन करणाऱ्या खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमतून राज्यभरात दरवर्षी शालेय पातळीवर होणाºया विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातील स्पर्धांमध्ये सहभागी होणाºया शालेय खेळाडूंना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून अशा खेळाडूंचे प्रस्ताव मागविले जातात. त्याची पडताळणी करून संबंधित खेळाडूला शिष्यवृत्तीचे वाटप होत असते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ३१ खेळाडूंनी विविध प्रकारच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. त्यात काहींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली. तर काहींना यश मिळाले नसले तरी त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने तेही शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यात सहा खेळाडूंनी प्रथम, आठ खेळाडूंनी द्वितीय तर सहा खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. इतर खेळाडंूनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्यांमध्ये कनोसा कॉन्व्हेंट, जो. रा. सिटी, न्यु. सिटी व आर. सी.पटेल स्कूलचे सर्वाधिक खेळाडू असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे