भीती न बाळगता जेष्ठांनी कोरोना लस घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:00+5:302021-03-07T04:33:00+5:30

प्रश्न: शासकीय रुग्णालयातून सहा दिवसात जेष्ठांना लस देण्यात आली? उत्तर: तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लस जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध ...

Seniors should be vaccinated against corona without fear | भीती न बाळगता जेष्ठांनी कोरोना लस घ्यावी

भीती न बाळगता जेष्ठांनी कोरोना लस घ्यावी

Next

प्रश्न: शासकीय रुग्णालयातून सहा दिवसात जेष्ठांना लस देण्यात आली?

उत्तर: तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लस जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ते ६ मार्च अशा सहा दिवसात शासकीय व मनपा रुग्णालयातून ५४६ जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान एकाही व्यक्तींना त्रास झालेला नाही.

प्रश्न: शहरातील किती व कधी खासगी रुग्णालयातून लसीकरण होईल?

उत्तर: महानगरातील तीन शासकीय रुग्णालयातून सध्या लसीकरण माेहीम सुरू आहे. खासगी रुग्णालयाना कोरोना लस उपलब्ध झाली आहे. सोमवारपासून जाहीर करण्ण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात २५० रुपयांमध्ये लस नागरिकांना उपलब्ध होणार आहे नोंदणी करतांना जेष्ठ नागरिकांना जवळचे रुग्णालयाची निवड करावी लागणार आहे.

प्रश्न: किती लस उपलब्ध झालेल्या आहेत व प्रतिसाद मिळतोय का?

उत्तर: लस घेण्यासाठी माेबाइल ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला काहींना अडचणी आल्या होत्या. मात्र सध्यातरी अडचणी दिसून येत नाही. जेष्ठ नागरिकांनी लस घ्यावी. यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यासाठी ३१ हजार कोवीशिल्ड व ७ हजार कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्या आहे.

प्रश्न: खासगी रुग्णालयांना लसीकरणाचे प्रशिक्षण दिले आहेत का?

उत्तर: लसीकरणाची भीती वाटू नये, लसची सुरक्षिता तसेच लस देण्याची पध्दत अशा विविध विषयांवर चर्चा होऊन खासगी दवाखान्यातील डाॅक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ॲपवर अशी करावी नोंदणी

६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यासाठी लस घेणाऱ्या व्यक्तींनी शासनाकडून देण्यात आलेल्या ॲपद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करतांना जवळचे हाॅस्पिटलची निवड करावी लागणार आहे.

खासगी रुग्णालये

एसीपीएम, खान्देश, भतवाल, केशरानंद, सेवा हाॅस्पिटल, ओम हाॅस्पिटल, इस्टिट्यूट ॲाफ युरोलाॅजी, साक्रीरोड, चंद्रकांत केले मेडिकल काॅलेज, श्री विघ्नहर्ता हाॅस्पिटल, देवरे, सिध्देश्वर, सुधा हेल्थ केअर, देसले हाॅस्पिटल साक्रीरोड, सुमालती हाॅस्पिटल साक्रीरोड, रायम हाॅस्पिटल धुळे या खासगी रुग्णालयात लसीकरण होईल.

दक्षता घ्यावी

बाजारात कोरोना लस जरी उपलब्ध झालेली असली तरी. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेल्या नाही. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी नागरिकांनी शासन आदेशाचे पालन करावे, असेही डाॅ. शिवचंद्र सांगळे यांनी सांगितले.

Web Title: Seniors should be vaccinated against corona without fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.