भूमिगत गटारीमुळे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:10 PM2020-02-16T22:10:33+5:302020-02-16T22:11:04+5:30

वाडीभोकर रोड । दुसऱ्यांदा खोदला रस्ता, पालिकेचे सतत दुर्लक्ष

Road mismanagement due to underground garbage | भूमिगत गटारीमुळे रस्त्याची दुरवस्था

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार या दोन योजनांनी वर्षभरात वाडीभोकर रस्त्याची पुरती वाट लावली आहे़ गेल्या वर्षी पाणीपुरवठा योजनेची नविन पाईपलाईन टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता़ ठेकेदाराने पाईप टाकल्यानंतर रस्ता बुजवला; पण त्याची दुरूस्ती केली नाही़ स्थानिक नागरीकांनी आंदोलन केल्यावर रस्त्याची दुरूस्ती झाली़
भूमिगत गटार योजनेच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जात आहे़ गेल्या महिन्यात राम नगर जवळ भूमिगत गटारीचा पाईप टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला़ त्यामुळे पाण्याचा पाईप फुटला़ पालिकेने पाईपलाईनची दुरूस्ती केली़ परंतु या ठिकाणी पुन्हा गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे़ शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे़ गटारीसाठी पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता त्वरीत दुरूस्त करावा लागेल अशी अट कार्यादंभ आदेशात आहे़ परंतु वाडीभोकर रस्ताच नव्हे तर अन्य कुठेही रस्त्याची दुरूस्ती झाली नाही़ त्यामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली आहे़ पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे़

Web Title: Road mismanagement due to underground garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे