दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:34+5:302021-04-23T04:38:34+5:30

दोंडाईचासह जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. दवाखाने, मेडिकल दुकान आदी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद आहेत. किराणासह इतर दुकानांना ...

Punitive action against shop operators | दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

दोंडाईचासह जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. दवाखाने, मेडिकल दुकान आदी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद आहेत. किराणासह इतर दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंत परवानगी आहे. तरी पण आज नियमांचे पालन न करता काही दुकाने आज उघडली होती. पोलीस-नगरपालिका प्रशासन यांनी दोडाईचात विविध ठिकाणी पाहणी केली. त्यात कापड, हार्डवेअर, स्टेशनरी इतर दुकाने उघडी होती.वेळेनंतर काही दुकाने उघडली होती.काही दुकानात सोशल डिस्टन्स नव्हते, तर मास्क पण लावले नव्हते. दुकानात गर्दी दिसून आली. विना परवानगी दुकान उघडले असल्याचे पथकाचे निदर्शनात आले. संबंधित दुकानदाराकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपमुख्यधिकारी हर्षल भामरे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास पाटील, पालिकेचे बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत ,भूपेंद्र बोरसे रुपेश पाटील, मनोज बोरसे, कपिल पाटील, मिलिंद पिंपळे, विजय बेडसे ,सागर निकम ,भरत चौधरी ,सुमित सोलंकी, कैलास पवार , राजेंद्र नगराळे ,दीपक बाविस्कर, इत्यादी अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात आली.

Web Title: Punitive action against shop operators