जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ‌उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:10+5:302021-04-08T04:36:10+5:30

धुळे : धुळे व नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सरकारी व खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनची ...

Provide stock of Remedesivir injection in the district | जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ‌उपलब्ध करून द्या

जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा ‌उपलब्ध करून द्या

धुळे : धुळे व नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सरकारी व खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असून नागरिकांना ते मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्ली येथे जाऊन देशाचे आरोग्य मंत्री ना. डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

धुळे व नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटात सापडलेला आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारी व खाजगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. सदर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुरेसा नसल्याने काही रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. तरी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी संसदरत्न खासदार डॉ. भामरे यांनी देशाचे आरोग्य मंत्री ना. डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Web Title: Provide stock of Remedesivir injection in the district