शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांमध्ये सक्षम महिला नेतृत्त्व नाही - सुप्रिया सुळे

By admin | Updated: April 20, 2017 13:03 IST

राजकारणात सक्षम महिला नेत्तृत्व मिळाले, तर देशाचा विकास आणखी झपाटय़ाने होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.

 धुळे, दि.20 - सद्य:परिस्थितीत महिलांनी सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र राजकीय पक्षांमध्ये आजही सक्षम महिला नेत्तृत्त्व मिळत नाही. राजकारणात सक्षम महिला नेत्तृत्व मिळाले, तर देशाचा विकास आणखी झपाटय़ाने होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  

धुळे शहरातील ङोड. बी. पाटील महाविद्यालयात गुरुवारी सकाळी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्या बोलत होत्या.  यावेळी मंचावर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, अरूण साळुंखे उपस्थित होते. खासदार सुळे यांनी सांगितले, की कॉलेज निवडणुका पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींना राजकारणाचेही धडे घेता येणार आहे. येथूनच देशाच्या विकासाचे ध्येय असलेले सक्षम नेतृत्व तयार होऊ शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशन द्यायलाच हवे. तसेच शिक्षणात आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे, असेही त्या म्हणाल्या. 
सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका 
कूलभूषण जाधव यांना खोटय़ा आरोपाखाली पाकि स्तानने अटक केली असून आता पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी येथे सांगितले. 
व्यापारी व डॉक्टरांशी केली चर्चा 
धुळे शहरातील जेलरोड येथील आएमए सभागृहात दुपारी खासदार सुळे या  डॉक्टर, व्यापारी यांच्याशी  चर्चा करत आहे. या कार्यक्रमानंतर त्या  रेल्वेस्टेशनरोडवरील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत.