शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप वाहन पुलावरुन कोसळली, ८ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:34 IST

धुळे ते सोलापूर मार्ग : ५ गंभीर, १९ जखमी रुग्णालयात

धुळे : मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील धवल्या व धवल्यागिरी येथून मजूर घेऊन जाणारी पिकअप वाहन बीडकडे जात असताना धुळे तालुक्यातील विंचूर गावानजिक पुलावरुन कोसळली़ अपघाताची ही घटना शनिवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात ८ जण जागीच ठार झाले आहेत़ तर, ५ जणं गभीर तर १९ जण जखमी झाले आहेत़ घटना लक्षात येताच रात्रीच मदतकार्य सुरु झाले़ दरम्यान, मयतमध्ये बालकांचा अधिक समावेश आहे़ जखमी आणि मयतांना रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्या व धवल्यागिर येथून एमएच २५ पी ३७७० क्रमांकाच्या पीकअप वाहनातून बीड येथील गुळाची भेली तयार करण्याच्या कारखान्यात काम करण्यासाठी मजुरांना नेले जात होते़ सोलापूर मार्गावर धुळे तालुक्यातील विंचूर गावानजिक असलेल्या बोरी-कानोली नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाजवळ येताच भरधाव वेगात असलेली पिकअप वाहन थेट पुलावरुन खाली कोसळली़ नदीत असलेल्या दगडामुळे पीकअप वाहन दोन ते तीन पलट्या घेतल्यानंतर चक्काचूर झाला़ या अपघातात रितेश लेदाराम आर्य (०६ महिने), जिन्या अंबू पावरा (१३), मियाली लेदाराम आर्य (२३), रविना लेदाराम आर्य (५), करण सेवासिंग बारेला (३), हरमसिंग सेवासिंग बारेला (५), लालसिंग अंबू पावरा (२०), गुड्डीबाई तुफानसिंग बारेला (३०) (सर्व रा़ धवल्यागिरी ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या आठ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे़ तसेच पाच जण गंभीर आहेत़ त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात