नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:28+5:302021-01-25T04:36:28+5:30

यावेळी बोलताना आमदार रावल म्हणाले, २०१४ पासून केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाली अन शिंदखेडा मतदारसंघातील सर्व सिंचनाची ...

Newly elected Gram Panchayat members felicitated | नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

यावेळी बोलताना आमदार रावल म्हणाले, २०१४ पासून केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाली अन शिंदखेडा मतदारसंघातील सर्व सिंचनाची कामे मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला. आज प्रत्येक गावांत साठवण बंधारे, सिंचन विहिरी, बांधता आल्या. एवढेच नव्हे, तर सुलवाडे जामफळ आणि प्रकाशा बुराई सारखी थंडबस्त्यात असलेली उपसा योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मोठ्या प्रमाणात निधी आपल्या शिंदखेडा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे, आता शिंदखेडा तालुक्यात ऊस आणि केळीची लागवड पाहताना मनस्वी समाधान होते.

यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात विकासाचा निधी पोहोचविण्याचे काम पुढील काळात करणार आहोत, परंतु नवनिर्वाचित सदस्यांनीही कामे करताना कुठेही भेदभाव न करता, सार्वजनिक हिताची कामे करावीत, असे आवाहन आ.जयकुमार रावल यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा.रमेश खैरनार यांचेही मार्गदर्शन लाभले.

Web Title: Newly elected Gram Panchayat members felicitated