शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:57 IST

Maharashtra Assembly Election 2024 And BJP Chitra Wagh : आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले.

धुळे : महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला १५०० रुपये चालू केले. महाविकास आघाडीने ही योजना चुकीची ठरविली. त्यातील काहीजण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. तुम्ही महिलांना लाच देता आहेत, असे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी म्हटले. परंतू, तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही. उलट महायुती सरकार सत्तेत येताच तुम्हाला महिन्याला २१०० रुपये मिळतील, ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. जे सावत्र भाऊ असतात, त्यांना आपल्या बहिणींचे चांगले झालेले सहन होत नाही, असा आरोप महिला भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी नकाणे रोडवरील राधेकृष्ण भवनात आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केला. 

मेळाव्याला धुळे शहर विधानसभेचे भाजप महायुतीचे उमदेवार अनुप अग्रवाल, उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्री अहिरराव, धुळे शहर प्रभारी आमदार मुकेश पटेल, जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाठ, माया परदेशी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रतिभा चौधरी, प्रतिभा शिंदे, वैभवी दुसाणे, अरुण पवार, आरती पवार, उर्मिला पाटील, जयेश वावधे, वंदना थोरात, प्रभादेवी परदेशी, मंगला पाटील, प्रिया कपोले, मोहिनी धात्रक, रंजना पाटील, नेहा अहिरराव यांच्यासह मोठ्या संख्येन महिला उपस्थित होत्या. आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dhule-city-acधुळे शहरChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा