तृतीय वर्षातील हितेश पाटील सर्वप्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:30 PM2020-02-15T12:30:03+5:302020-02-15T12:30:50+5:30

धुळे : एसव्हीकेएम फार्मसीचा निकाल १०० टक्के

Hitesh Patil is the first in the third year | तृतीय वर्षातील हितेश पाटील सर्वप्रथम

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेतर्फे घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.फार्मसीचा प्रथम सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून धुळे येथील एस.व्ही.के.एम. इन्स्टिटयूट आॅफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले़
महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून प्रथम वर्षातील अक्षय चौधरी ८़४८ सीजीपीए गुण, खुशी जोशी ८़४४, पीनल पाटील ८़४१ सीजीपीए गुण मिळवून उत्तीर्ण झालेत़ द्वितीय वर्षातील प्रेरणा पाटील ८़६२, सायली बाविस्कर ८़४४, मोहित केवलानी ८़३९ सीजीपीए गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. तृतीय वर्षातील हितेश पाटील ८़५६ प्रथम, पायल गजघाटे ८़५४ द्वितीय व राची अग्रवाल ८़५२ सीजीपीए गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील परीक्षेतील यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे ट्रस्टी चिंतनभाई पटेल, ट्रस्टी तपनभाई पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, संस्थेचे सल्लागार डॉ.अजय पसारी, धुळे कॅम्पसचे डायरेक्टर डॉ.के.बी. पाटील, प्राचार्य डॉ.समीर गोयल यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांना प्रा.मनोज गादेवार, प्रा.आरती बेलगमवार, प्रा.भूषण द्रवेकर, प्रा.गिरीजा भवर, प्रा.राजीव जुने, प्रा.किरण आहेर, प्रा.नयन गुजराथी, प्रा.मृगेंद्र पोतदार, प्रा.नितीन नेमा, अब्दुल्ला शेरीकर, प्रा.सुमित राठोड, प्रा.कुणाल बचाव, प्रा.प्रदीप बावणे, प्रा.उस्मान सीदिकि, राजू वाडेकर, प्रा.महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Hitesh Patil is the first in the third year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे