शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपेढीला 'आयकर'चा टच!

By admin | Updated: December 4, 2014 14:56 IST

सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्‍यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती.

जळगाव/भुसावळ : सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्‍यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. तर भुसावळच्यादोन प्रतिष्ठानांवर याच पथकातील अधिकार्‍यांनी दिवसभर तपासणी केली. 

जळगावातील सराफ बाजारातील सुराणा ज्वेलर्सचे संचालक किशोर सुराणा यांच्याकडे पथकाने खतावणी, नोंदवही तसेच स्टॉक रजिस्टरची मागणी केली. सुराणा यांनी पुरविलेली माहिती व प्रत्यक्षात दुकानात असलेले सोने व चांदीचे दागिने यांची पडताळणी पथकाकडून करण्यात येत होती.
चौफेर तपासणी : विभागाच्या आणखी काही पथकांकडून काही प्रतिष्ठांनाची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा प्राप्त होऊ शकला नाही. तपासणीत नेमकी काय माहिती हाती लागली? याचा तपशील देण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. तर स्थानिक पथकाकडून ही तपासणी सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रतिष्ठानांकडून विक्री झालेल्या मालाबाबत कागदपत्रांची तपासणी केली. माहिती देण्यास अधिकार्‍यांनी असर्मथता दर्शवली. केवळनियमित तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले. 
----------------
भुसावळातील जामनेर रस्त्यावरील मनोहर मनवानी यांच्या सेरॉमिक सेंटरसह दिनेश मोटूमल चांदवाणी यांच्या आकार ट्रेडर्समध्ये आयकर विभागाने सकाळपासून तपासणी केली. नियमित स्वरूपाची ही तपासणी आहे. यापूर्वी पाच ते सहा वर्षांपूर्वीदेखील तपासणी करण्यात आली होती.  -किशोर सुराणा, सुराणा ज्वेलर्स
 सुराणा यांच्याकडे तपासणीदरम्यान पथकाने दुकानातील कारागीर तसेच मालकांना बाहेर न जाण्याची सूचना केली. आयकर अधिकार्‍यांकडून तपासणी सुरू असल्याने दिवसभर व्यवहार बंद होते.