कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्विकारले आॅनलाईनचे आधुनिक तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 08:50 PM2020-09-20T20:50:35+5:302020-09-20T20:50:52+5:30

शिरपूर । दुर्गम भागात नेटवर्कचे अडथळे असतानाही त्यावर केली मात, घेतले शिक्षण

Corona allows students to embrace modern online technology | कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्विकारले आॅनलाईनचे आधुनिक तंत्रज्ञान

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूर हा निम्मा आदिवासी तालुका आहे़ येथील आदिवासी डोंगरदऱ्यांमध्ये वास्तव्यास आहे़ कोरोना रोगामुळे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, स्मार्टफोन, लॅपटॉप, लहान, तरूण, थोर व्यक्तींकडे दिसू लागले आहेत़ आॅनलाइन शिक्षण झाल्याने आता दुर्गम भागातील मुलांकडे मोबाईल वा लॅपटॉप दिसू लागले आहेत़
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले वर्ग, समोर डायसवर उभे राहून अध्यापन करणारे शिक्षक हे चित्र कोरोनामुळे पालटले आहे़ त्याऐवजी शाळांतील वर्गांमध्ये एकमेव गुरूजी मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असल्याचे दिसत आहे़ कोरोनामुळे वार्षिक परीक्षेच्या आधीच मार्च महिन्याच्या अखेरीला सर्व शाळा लॉकडाऊन झाल्या़ उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर १५ जूनला शाळा उघडतात़ मात्र आज-उद्या करता-करता निम्मा सप्टेंबर महिना संपला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत़ आता दिवाळीनंतरच शाळा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने निम्मे सत्र विद्यार्थी घरीच असणार आहेत़ विद्यार्थ्यांच्या घरबसल्या शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेने पुढकार घेतला असून व्हॉटस्अ‍ॅप आणि गुगल मिटने विद्यार्थ्यांचे आॅनलाईन तास सुरू झाल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहायला मिळत आहे़ कोरोनावर मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण देवून त्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत़ शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम शहरासह गावोगावी लाबविला जात आहे़ या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांना अडचणी असल्या तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही दिसते़ अनेक शाळांतील शिक्षकांनी वाडी-पाड्यावर जावून आणि पारावर शाळा भरविण्याचा उपक्रम राबविला़ मात्र कोरोना ग्रामीण भागातील वाड्यापाड्यांवरही पोहोचल्याने आॅनलाईन तास घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे समोर आले आहे़

Web Title: Corona allows students to embrace modern online technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.