शिंदखेड्यात रसायनशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 08:47 PM2020-02-12T20:47:30+5:302020-02-12T20:48:53+5:30

८२ प्राध्यापकांचा सहभाग : एसएसव्हीपीएस कॉलेजमध्ये आयोजन

Chemistry course reorganization workshop in Shindkheda | शिंदखेड्यात रसायनशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनच्या रसायनशास्त्र विषयाच्या सीबीएससी पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा एसएसव्हीपीएस महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.टी. पावरा यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रफुल्लकुमार सिसोदे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, उपप्राचार्य प्रा.सी.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.टी. पावरा यांनी अभ्यासक्रमात होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची प्रगती व सुविधांविषयी माहिती दिली. रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एस. राजपूत यांनी तृतीय वर्ष रसायनशास्त्र वर्गाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा व अभ्यासक्रम बदलत्या युगानुसार पारंपारिक अभ्यासक्रम न ठेवता कौशल्यपूर्ण व यू.जी.सी.च्या मार्गदर्शक अभ्यासक्रमानुसार आपला अभ्यासक्रम तयार करावा, असे सांगितले. अभ्यासक्रम तयार करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विचारात घेऊन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करावा, असे आवाहन प्रफुल्लकुमार सिसोदे यांनी केले. कार्यशाळेत ८२ प्राध्यापक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एस. पाटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्रा.एस.एस. सनेर यांनी केले.
रसायनशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा.डॉ.एस.एस. राजपूत यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. समारोपीय अध्यक्षपद प्रा.डॉ. एस.एस. राजपूत यांनी भूषविले. यावेळी डॉ.एस.एस. राजपूत यांनी भविष्यात येणारा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व रोजगार निर्मिती करणारा असावा, असे सांगितले. कार्यशाळेसाठी प्रा.एस.एस. सनेर, प्रा.डॉ.पी.आर. पाटील, डॉ.एस.एस. पाटोळे, प्रा.जे.जी. पाटील, प्रा.पी.एम. महाले, प्रा.योगेश अहिरराव, प्रा.डॉ. तुषार पाटील, प्रा.व्ही.एम. केशे, प्रा.आर.टी. जाधव, प्रा.आर.पी. चव्हाण, प्रा.डॉ. यू.पी. खैरनार, प्रा.तुषार करंके, रवींद्र देसले, युवराज बोरसे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Chemistry course reorganization workshop in Shindkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे