शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 07:29 IST

Dhule Crime: पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता.

पिंपळनेर (धुळे): ज्या मांडवात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि दोन कुटुंबे रेशीमगाठीत अडकणार होती, तिथेच क्षुल्लक वादातून रक्ताचा सडा पडला. व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन नवरदेवाकडील नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात साक्री येथील बाप-लेकासह तिघांचा करुण अंत झाला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. मात्र, लग्नापूर्वीच नवरदेवाकडील काही तरुणांनी सोशल मीडियावर "तुमचे अस्तित्व संपवू" अशा आशयाचे चिथावणीखोर स्टेटस आणि रील्स अपलोड केले होते. गुरुवारी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमात या स्टेटसवरून दोन्ही पक्षांत वाद झाला. यात सुरेश गोसावी (५०) आणि त्यांचा  मुलगा साहिल  (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच देवेंद्र पवार (३०) या तरुणालाही आपले प्राण गमवावे लागले.

आरोपींच्या घाटात आवळल्या मुसक्या

घटनेनंतर आरोपींनी कारने गुजरातच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत नाकाबंदी केली आणि गुजरात सीमेवरील ओटाबारी घाटात पाठलाग करून तिघांना अटक केली. यात कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) यांचा समावेश आहे. एका सोशल मीडिया स्टेटससाठी तीन संसार उद्ध्वस्त झाल्यानेतीव्र संताप व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wedding Turns Bloody: Status Dispute Claims Three Lives in Maharashtra

Web Summary : A wedding celebration in Pimpalner turned tragic after a WhatsApp status dispute escalated, resulting in the deaths of a father, son, and another man. Relatives of the groom attacked, leading to arrests near the Gujarat border. The incident highlights the devastating consequences of social media-fueled conflict.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळेDeathमृत्यूWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप