शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शबरी घरकुल योजनेचा लाभ ग्रा.पं. सदस्य व परिवाराला दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:00 IST

पिंपळनेर : पुनाजी नगर येथील ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

पिंपळनेर : टेंभे प्र.वार्सा ग्रामपंचायतीने शबरी घरकुल योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांचा लाभ ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या परिवाराला दिल्याचा आरोप पुण्याचापाडा पैकी पुनाजी नगर येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण विकासमंत्री व साक्रीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.टेंभे प्र.वार्सा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुण्याचापाडा पुनाजीनगर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर भोंगळ कारभाराचा आरोप केला आहे. शबरी घरकुल योजना, स्वच्छतागृह, तसेच १४व्या वित्त आयोगांतर्गत निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, टेंभे प्र.वार्सा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत १४ पाड्यांचा समावेश असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्वच्छताअंतर्गत सुमारे ६०० स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी काही स्वच्छतागृहे हे सरपंच व उपसरपंच यांनी मतदान पद्धतीने स्वत: बांधले आहे. मात्र, या स्वच्छतागृहांना अद्यापही दरवाजे बसविलेले नाही. तसेच टाक्याही बांधलेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थी त्याचा वापर करीत नाही. मात्र, या स्वच्छतागृहाची १०० टक्के देयके अदा करण्यात आलेली आहेत, असे समजते. ग्रामपंचायतीमार्फत चौदाव्या वित्त आयोग आर्थिक वर्षाचे विकास कामे घेण्यात आलेली आहे. त्यात समाज मंदिराची कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाची ही कामे आहेत. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून याची चौकशी करण्याची मागणी विकास बागुल, सुरेश ठाकरे, योगेश भोये, ज्ञानेश्वर बागुल, शालिग्राम भोये, शिवाजी अहिरे, सुनिल पवार, एकनाथ देशमुख, अनिल देशमुख, छोटीराम बागुल, अजय गायकवाड, लक्ष्मण बागुल, संजय गायकवाड, खंडू पवार, रामू शिंदे, केशव गायकवाड, गमन देसाई यांनी केली आहे.घरकुल वाटपात ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या वर आहे त्यांना घरकुल देता येत नाही. त्यामुळे कुठलाही अन्याय कोणावरही झालेला नाही. ग्रामसभेत या सर्व विषयांवर चर्चा होत असते. होत असलेले आरोप चुकीचे आहेत. सुरु असलेली विकासकामे काही ग्रामस्थांना रुचत नसल्याने ते आमच्यावर चुकीचा आरोप करीत आहेत.-सचिन राऊत, सरपंच टेंभे प्र. वार्सा

टॅग्स :Dhuleधुळे