महिला कर्मचाऱ्यावरील हल्ले न थांबविल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:54+5:302021-06-11T04:24:54+5:30

नंदुरबार येथील आदिवासी महिला कर्मचारी नीशा पावरा या त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत असताना, नंदुरबार शहरातील भाजप नगरसेवक गौरव ...

Agitations if attacks on female employees are not stopped | महिला कर्मचाऱ्यावरील हल्ले न थांबविल्यास आंदोलन

महिला कर्मचाऱ्यावरील हल्ले न थांबविल्यास आंदोलन

Next

नंदुरबार येथील आदिवासी महिला कर्मचारी नीशा पावरा या त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत असताना, नंदुरबार शहरातील भाजप नगरसेवक गौरव चौधरी याने त्यांना धक्काबुक्की करत जातीवाचक भाषेचा वापर केला आहे. हीघटना ही आदिवासीबहुल जिल्ह्यात घडलेली आहे.

अवैध रेती व्यवसाय करणाऱ्या या भाजप नगरसेवकामागे कुणाचे राजकीय पाठबळ आहे? याचा शोध घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील गंभीर दखल घेत याप्रकरणी कडक कार्यवाही केली पाहिजे.

जिल्हा प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी सामाजिक हक्क समिती करीत असून, त्वरित कार्यवाही न झाल्यास शासन आणि प्रशासन यांना जबाबदार धरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़

तहसीलदारांना निवेदन देतेवेळी सामाजिक हक्क समितीचे कॉम्रेड प्रा़. शैलेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रमोद शिरसाठ, दादा शिरसाठ, विकी पवार, बाबा पाटोळे, बॉबी गुलाले, सुनील पावरा, दादू पारधी, धम्मदीप मोरे, राजेश सावळे, आकाश सोनार, गौतम थोरात, अविनाश बिहार्डे, प्रेम बिऱ्हाडे, भूषण पवार, पंकज कुंवर, मयूर जाधव, तुषार बाविस्कर, धम्मदीप, रतन थोरात, करण महिरराव यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Agitations if attacks on female employees are not stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.