Dhule Crime: धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एक १८ वर्षीय तरुणी भरदिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या बेपत्ता तरुणीचे नाव असून, तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात संमोहन किंवा जादूटोण्यासारख्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय दिसतंय सीसीटीव्हीमध्ये?
शुक्रवारी दुपारच्या सुमारास संजीवनी आपल्या घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती समोरून जाताना दिसत आहे. तो व्यक्ती पुढे गेल्यानंतर संजीवनीने चालायला सुरुवात केली, मात्र तिची चालणे अत्यंत विचीत्र होते. चालताना तिचा एक हात हवेत उंचावला असून, जणू काही एखादी अदृश्य शक्ती तिचा हात धरून तिला वेगाने ओढत नेल्याचा दावा केला जातोय. व्हिडीओमध्ये संजीवनीला कसला तरी त्रास होत असल्याचे दिसून आलं. भरदिवसा घडलेल्या या घटनेत संजीवनीची अवस्था एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असलेल्या व्यक्तीसारखी दिसत आहे.
संमोहन की आणखी काही? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक नेले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. दुसरीकडे, तr घर सोडून गेली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिचा हवेत असलेला हात या प्रकरणाला अधिकच संशयाचे कारण ठरत आहे.
शोध सुरु, तरीही थांगपत्ता नाही
घटनेची माहिती मिळताच संजीवनीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शहरभर तिचा शोध घेतला. मात्र अद्याप तिचा कोणताही शोध लागलेला नाही. धुळेपोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
कुटुंबीयांचे कळकळीचे आवाहन
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच संजीवनीच्या या विचित्र पद्धतीने बेपत्ता होण्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संजीवनी राहुल वराडे हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठेही दिसून आल्यास, त्वरित तिच्या कुटुंबाशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Summary : An 18-year-old girl disappeared in Dhule, Maharashtra, sparking widespread concern. CCTV footage shows her walking strangely, leading to speculation about abduction or hypnotism. Police are investigating, and the family appeals for information.
Web Summary : महाराष्ट्र के धुले में 18 वर्षीय लड़की गायब हो गई, जिससे व्यापक चिंता फैल गई। सीसीटीवी फुटेज में उसे अजीब तरह से चलते हुए दिखाया गया है, जिससे अपहरण या सम्मोहन के बारे में अटकलें लगाई जा रही हैं। पुलिस जांच कर रही है, और परिवार ने जानकारी के लिए अपील की है।