शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह तिघे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:10 IST

कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कृष्णाथ साठे यांची हत्या; पत्नीवरच संशयाची सुई, तुळजापुरात खळबळ.

तुळजापूर (जि. धाराशिव) : तालुक्यातील मंगरूळ येथे कृष्णाथ आनंद साठे (३६, रा. मंगरूळ) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाथ साठे यांची मंगळवारी रात्री अज्ञात हत्याराने डोक्यात गंभीर वार करून हत्या करण्यात आली. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पडीक जमिनीवर हा प्रकार घडला. आरोपींनी केवळ हत्याच केली नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तब्बल ९० फूट अंतरावर फरफटत नेऊन ओढ्याच्या कडेला फेकून दिला. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. संशयाची सुई कुटुंबातील व्यक्तींकडे वळल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सध्या पोलिसांनी कृष्णाथ यांची पत्नी आणि अन्य दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कृष्णाथचा खून नेमका काेणी आणि कशासाठी केला? रात्री उशिरापर्यंत स्पष्टही झालेले नव्हते, याप्रकरणी तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबाचा आधार हरपलामयत कृष्णाथ हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांचे वडील आजारी असून, आई शेतीकाम करते. घराची सर्व जबाबदारी कृष्णाथ यांच्या खांद्यावर होती. कधी साखर कारखान्यावर, तर कधी तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. एकुलत्या एक कमावत्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Young man brutally murdered in Tuljapur; wife, three suspects detained.

Web Summary : In Mangrul, Krishnath Sathe was brutally murdered. His body was dragged 90 feet. Police detained his wife and two others for questioning. Investigation is ongoing to determine the motive.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव