शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचा उतारा आला निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST

बलसूर परिसरात तुरीच्या राशी सुरू : केलेला खर्चही हाती पडणे झाले मुश्कील बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरातील ...

बलसूर परिसरात तुरीच्या राशी सुरू : केलेला खर्चही हाती पडणे झाले मुश्कील

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरातील व्हंताळ, कडदोरा, रामपूर, काळनिंबाळा, कलदेव निंबाळा, जकेकूर, एकुरगा, येळी आदी गावात तुरीच्या राशींना आता वेग आला आहे. मात्र, एकरी सहा ते सात क्विंटल उतारा अपेक्षित असताना प्रत्यक्षात तीन ते चार क्विंटल उतारा पडत असून, यातून झालेला खर्चही हाती पडणे मुश्कील झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी अशा सततच्या संकटाचा सामना केल्यानंतरही हताश न होता शेतकऱ्यांनी जोमाने खरीपातील पेरण्या केल्या. बलसूरसह परिसरात यंदा जवळपास १४०० हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. याच्या पेरणीनंतर सुरुवातीला पिकांना उपयुक्त असा पाऊस पडल्याने पिके जोमात होती. मात्र, त्यानंतर दोन महिने पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली. शिवाय, योग्य अशी फळधारणाही झाली नाही. त्यातच रोगराईचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशक फवारणी केली. परंतु, पाऊसच नसल्याने त्याचाही उपयोग झाला नाही.

सध्या परिसरात तुरीच्या राशी सुरू असून, एकरी केवळ तीन ते चार क्विंटलचा उतारा पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे निघणाऱ्या उत्पादनातून खते, बियाणे, खुरपणी, मजूर, कीटकनाशक आदींचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

चौकट.....

...तर परिस्थिती आणखी कठीण होईल

तुरीचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तीन ते चार क्विंटल उत्पादन निघत आहे. बाजारात तुरीला ५ हजार ९०० रुपये दर असला तरी निघणाऱ्या उत्पादनातून पेरणीपूर्व मशागत, पेरणी, खते, बियाणे, आंतर मशागत, खुरपणी, कापणी, भरडणे आदी खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. त्यात मालामध्ये दोष काढून व्यापाऱ्यांनी भाव कमी केल्यास परिस्थिती आणखी कठीण होणार आहे.

कोट.....

हाताशी आलेले सोयाबीन गेले. यानंतर तुरीवर फळ धारणेच्या पहिल्या भारामध्ये पाऊस नसल्याने फुले गळाली. दुसऱ्या भारात धुक्यामुळे फुले गळून फळ धारणा झाली नाही. यामुळे तुरीच्याही उत्पादनात मोठी घट झाली असून, मिळालेल्या उत्पन्नातून पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्चही निघणार नाही.

- मनोज हिंगमिरे शेतकरी बलसूर.