शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव तातडीने पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे ...

उस्मानाबाद : येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एनएमसी) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने बुधवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव संजय सुरवसे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करून घेणे याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी. जागा हस्तांतरित झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उस्मानाबाद येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

चौकट........

जागेबाबतही कार्यवाही करा

उस्मानाबाद येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे १०० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजे २५ एकर जागा लागणार आहे. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.