उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 16:52 IST2018-09-12T16:51:30+5:302018-09-12T16:52:55+5:30

आकाशवाणी केंद्रात साफसफाईचे काम करणाऱ्या एका २२ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला़

In Osmanabad aakashawani centre one worker dies due to electricity shock | उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू

उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू

उस्मानाबाद : येथील आकाशवाणी केंद्रात साफसफाईचे काम करणाऱ्या एका २२ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला़ तर इतर दोघे जखमी झाले़ ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी केंद्रात घडली़

येथील आकाशवाणी केंद्रात शाम महादेव भोसले (वय-२२), विजय सोमनाथ सरपाळे (१९ दोघे रा़ गावसूद ता़उस्मानाबाद) व अनिल पवार (वय-३० रा़ समुद्रवाणी ता़उस्मानाबाद) हे तिघे कंत्राटी सफाई, गेटमन कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते़ हे तिघे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिडी ढकलत नेत होते़ त्यावेळी आकाशवाणी केंद्र परिसरातून गेलेल्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचा शिडीला स्पर्श झाल्याने तिघांना विद्युत धक्का लागला़ यातच शाम भोसले याचा मृत्यू झाला़ तर अनिल पवार, विजय सरपाळे हे दोघे जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़.

Web Title: In Osmanabad aakashawani centre one worker dies due to electricity shock