शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी महाराष्ट्र क्रांतीसेनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST

कळंब शहरातील माता रमाईनगर, सावरगाव पुनर्वसन भागात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती इतर मागासवर्गीय कुटुंबांनी अतिक्रमण केले ...

कळंब शहरातील माता रमाईनगर, सावरगाव पुनर्वसन भागात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती इतर मागासवर्गीय कुटुंबांनी अतिक्रमण केले आहे. मागील २५ वर्षांपासून ही कुटुंबे पत्र्याचे शेड मारून या ठिकाणीच राहत आहेत. हे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे. तसेच सध्या राहत असलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल आवास ग्रामीण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात यावी, या मागणीसाठी कळंब नगर परिषद, तहसील कार्यालयासमोर आंदोलने, माेर्चा, उपोषण, ठिय्या आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलने तसेच निवेदनही देण्यात येत आहेत.

मात्र, अद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसावे लागण्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना सरकारी नियामानुसार नियमानुकूल करून घेऊन, कुटुंबांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हनुमंत डोंगरे, वसंत देडे, समाधान डोंगरे आदी उपस्थित होते.