शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता ...

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांचे कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकेचे कर्ज, दुकान भाडे भरण्यासाठी गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन अशा संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयातून व्यक्त केल्या जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनास अटकाव बसावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दर रविवारी जनता कर्फ्यू तसेच रात्री सात वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्य शासनाने राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान राबविले असून, या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे लहान व मध्यम व्यावसायिकांची आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुकाने बंद असतानाही दुकानाचे भाडे, बँकाचे कर्ज, लाईट बिल, फायनान्सचे हप्ते भरावे लागणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबातून ब्रेक द चेन अभियानास तीव्र विरोध होत आहे.

पाच महिने सुरू राहिला व्यवसाय कर्ज कसे फेडायचे

गतवर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या कालावधीत तब्बल चार ते पाच महिने दुकाने बंद होती. त्यानंतर खबरदारी घेत दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने मुभा दिली. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे म्हणावा तसा व्यवसाय होत नव्हता. दसरा, दिवाळी सणापासून मार्केट पूर्वपदावर येऊ लागले. पाच महिने व्यवसाय सुरळीत चालू होता. आता पुन्हा दुकाने बंद करावी लागली आहेत. त्यामुळे आता व्यवसाय कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांपुढे आहे.

प्रतिक्रिया...

गेल्या वर्षी दाेन महिने दुकान बंद होते. त्यामुळे पाच महिन्याचे दुकानाचे भाडे घरूनच भरावे लागले. आता पुन्हा दुकान बंद झाले आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

मनीषा क्षीरसागर,

कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद करणे, लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आणखी कठोर निर्बंध करावेत, दुकानाची वेळ कमी करावी, परंतु, ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावू नये.

अश्विनी गोरे

पहिल्या टप्प्यात दुकाने पाच ते सहा महिने सुरू राहिली. यानंतर पुन्हा एकदा शासनाने कठोर निर्बंध लागू केले. आमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. देणी भागवायची कशी, हा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.

निकिता कांबळे,

पॉईंटर

जिल्ह्यात २४० दिवस राहिली दुकाने सुरू