शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

किराणा, फळ, दूध आता दुपारी २ पर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात काही अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना, विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू खरेदीच्या बहाण्याने लोकांची ...

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात काही अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना, विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू खरेदीच्या बहाण्याने लोकांची गर्दी होत असल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय, पाणीपुरवठा व अन्य सहा अत्यावश्यक सेवांनाच २४ तास परवानगी जारी केली आहे. त्यामुळे उर्वरित दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच उघडी राहतील.

१४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन व विहीत वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने व सेवांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, आता किराणा, दूध, भाजीपाल्याच्या नावाखाली नागरिकांचा सर्रास वावर सुरू असल्याचे चित्र शहरातून दिसून येत आहे. ग्रामीण भागातही काही वेगळे चित्र नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी वर्दळ कमी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आता वैद्यकीय, विद्युत, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, गॅस, पेट्रोल आदी सेवांनाच मुभा देऊ केली आहे. उर्वरित सर्व अत्यावश्यक सेवा या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत.

पूर्णवेळ काय सुरू...

दवाखाने, मेडिकल, वैद्यकीय विमा कार्यालये, ऑप्टिकल्स तसेच आरोग्य सेवेकरिता आवश्यक उत्पादने निर्मिती व वितरणासाठीचे घटक, त्यांची वाहतूक. विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा, बसेस. मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, एटीएम, विद्युत सेवा, गॅस सिलेंडर पुरवठा. या सर्व घटकांत काम करणार्या कर्मचार्यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक. उस्मानाबादेतील पोलीस पेट्रोलपंप. नगरपालिका व नगरपंचायतीच्या हद्दी जेथे संपतात तेथून १० किमी अंतरापुढील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप.

अर्धवेळेत कोणत्या सेवा...

किराणा दुकान, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, शेतीविषयक वस्तू, उत्पादन विक्रीची दुकाने, अन्नपदार्थांची पार्सल सेवा, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीपासून १० किमीच्या आतील सर्व पेट्रोलपंप व यापूर्वी राजय शासनाने सूट दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील उर्वरित आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच सुरु राहतील. दुपारी २ वाजल्यानंतर या सर्व सेवा देणाऱ्या आस्थापना बंद कराव्या लागतील, तसेच यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संचारावर निर्बंध असणार आहेत. याचे उल्लंघन केल्यास कार्यवाही होईल.