धाराशिवमध्ये चेक पोस्टवर झेंडावंदन सुरु असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना मोबाईलमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:32 IST2026-01-26T13:31:22+5:302026-01-26T13:32:08+5:30

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ही दुर्दैवी घटना घडली.

Excise Officer Collapses and Dies During Republic Day Flag Hoisting in Dharashiv | धाराशिवमध्ये चेक पोस्टवर झेंडावंदन सुरु असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना मोबाईलमध्ये कैद

धाराशिवमध्ये चेक पोस्टवर झेंडावंदन सुरु असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना मोबाईलमध्ये कैद

Dharashiv Excise Officer Death: प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, धाराशिव जिल्ह्याला चटका लावणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क (अबकारी) विभागाचे अधिकारी मोहन जाधव (५५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तिरंग्याला मानवंदना देत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आनंदाच्या क्षणी काळाचा घाला 

प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी सकाळी तलमोड येथील चेक पोस्टवर ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. मोहन जाधव हे अत्यंत उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. ध्वजवंदन सुरू असताना आणि राष्ट्रगीत सुरु असतानाच जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ते काही क्षण सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सर्वासमोर जमिनीवर कोसळले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जाधव हे तिरंग्यासमोर उभे होते आणि अचानक त्यांचा तोल गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूरवर शोककळा मोहन जाधव हे मूळचे सोलापूरचे रहिवासी होते. उमरगा येथील कर्तव्य निभावत असताना त्यांनी आपल्या कामाप्रती नेहमीच निष्ठा जपली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अबकारी विभागात शोककळा पसरली आहे. "जाधव हे मनमिळावू आणि कामात शिस्तप्रिय अधिकारी होते, प्रजासत्ताक दिनीच त्यांचे असे जाणे मनाला चटका लावणारे आहे," अशा शब्दांत त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 

Web Title : धाराशिव में झंडावंदन के दौरान आबकारी अधिकारी की मौत; घटना कैमरे में कैद।

Web Summary : धाराशिव में गणतंत्र दिवस समारोह के दौरान, आबकारी अधिकारी मोहन जाधव का झंडावंदन करते समय दिल का दौरा पड़ने से दुखद निधन हो गया। चौंकाने वाली घटना कैमरे में कैद हो गई, जिससे समर्पित अधिकारी के सहकर्मी और परिवार शोक में हैं।

Web Title : Excise officer dies during flag hoisting in Dharashiv; incident captured.

Web Summary : During Republic Day celebrations in Dharashiv, an excise officer, Mohan Jadhav, tragically died of a heart attack while hoisting the flag. The shocking incident was captured on video, leaving colleagues and family in mourning for the dedicated officer.