शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार, कास्टिंग डायरेक्टरसह तिघांना अटक, सीआययूची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 07:54 IST

मुंबईसह राज्यभरात कास्टिंग डायरेक्टर, तसेच चित्रपट निर्माता असलेला संदीप हा प्रेम या नावाने विविध नवोदित कलाकार, तसेच मॉडेल्सना वेश्या व्यवसायात ढकलत होता. यात काही तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते.

मुंबई: जुहूच्या रामाडा प्लाझा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून सुटका केलेल्या ८ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार ठरल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. त्यांना सिनेमात काम देण्याच्या नावाखाली यात ढकलण्यात आले होते. याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर संदीप दशरथ इंगळेसह तिघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.मुंबईसह राज्यभरात कास्टिंग डायरेक्टर, तसेच चित्रपट निर्माता असलेला संदीप हा प्रेम या नावाने विविध नवोदित कलाकार, तसेच मॉडेल्सना वेश्या व्यवसायात ढकलत होता. यात काही तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. यात अडकणाऱ्या मॉडेल्सना ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेतील काही भाग देऊन उर्वरित रक्कम तो स्वतःसाठी खर्च करीत होता.याबाबत माहिती मिळताच, सीआययूचे प्रमुख सचिन वाझे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोगस ग्राहक पाठवून आरोपींसोबत संवाद साधला. वेश्या, दलाल यांनी त्यांना व्हॉट्सॲपवर मॉडेल्स मुलींचे फोटो पाठविले आणि मुलींना जुहू चौपाटीजवळील रामडा इन पाम ग्रोव येथे घेऊन येत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे येथील हॉटेलमध्ये ९ रूम बुक करून मुलींना बोगस ग्राहकांसोबत पाठविण्यात आले. त्यानुसार पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता छापा टाकून ही कारवाई केली.या कारवाईत मुलींसाठी पथकाने संदीपच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले होते. या छापा कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५९ हजार रुपयांची रोकड आणि १५ स्मार्टफोन, तसेच कार जप्त केली. यात संदीपसह तान्या योगेश शर्मा (३१), हनुफा मुजाहीद सरदार ऊर्फ तानिया (२६) यांना बुधवारी अटक केली. यात सुटका केलेल्या ८ तरुणींनी विविध चित्रपट, वेबसिरीजसह जाहिरातींमध्ये मॉडेल्स म्हणून काम केले आहे. त्यांना मॉडेल्स, अभिनेत्री म्हणून चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईWomenमहिलाPoliceपोलिस